Gujarat News : यूएस अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून, गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील पोलिसांनी एका कथित रॅकेटचा शोध लावण्यासाठी तपास सुरू केला आहे. या विद्यार्थ्यांनी कॅनडातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी उच्च आंतरराष्ट्रीय इंग्रजी भाषा चाचणी प्रणालीमध्ये (IELTS)चांगला स्कोअर मिळवला. मात्र जेव्हा या तरुणांना अमेरिकेतील न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायाधीशांनी इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते अयशस्वी ठरले. तेव्हा न्यायालयाला आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 


परीक्षेदरम्यान हॉलमधील सीसीटीव्ही बंद 
मेहसाणा पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन ग्रुप (एसओजी) इन्स्पेक्टर भावेश राठोड यांनी सांगितले की, गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या IELTS परीक्षेदरम्यान हॉलमधील सीसीटीव्ही बंद असल्याने परीक्षा आयोजित करणार्‍या एजन्सीने कोणतीही पारदर्शकता नसल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आले आहे. या वर्षी मार्चमध्ये, कॅनडात अनधिकृतपणे प्रवेश मिळवण्याचा प्रयत्न करत असताना अमेरिकेच्या सीमा अधिकाऱ्यांनी गुजरातमधील सहा तरुणांना अटक केली होती. गुजरातमधील हे सहा भारतीय तरूण, 19-21 वयोगटातील, कॅनडाच्या सीमेजवळ, अमेरिकेतील अक्वेस्ने येथील सेंट रेगिस नदीत बोटीतून पकडले गेले. चार तरूण मेहसाणा येथील, तर दोन गांधीनगर आणि पाटण येथील आहेत. 


IELTS स्कोअर असलेल्या गुजरातच्या 4 तरुणांना इंग्रजीही बोलता आले नाही
जेव्हा या तरुणांना अमेरिकेतील न्यायालयात हजर करण्यात आले. तेव्हा न्यायाधीशांनी इंग्रजीत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यास ते अयशस्वी ठरला. न्यायालयाला हिंदी अनुवादकाची मदत घ्यावी लागली. या विद्यार्थ्यांनी आयईएलटीएस मध्ये म्हणजेच इंग्रजी प्राविण्य चाचणीत 6.5 ते 7 बँड गुण मिळवल्याने कोर्ट थक्क झाले. असे पोलिसांनी सांगितले. या घटनेच्या वृत्ताचा हवाला देत, मुंबईतील यूएस कॉन्सुलेट जनरलच्या क्रिमिनल फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन युनिटने मेहसाणा पोलिसांना एक मेल पाठवून तपास केला. आणि येथील चार विद्यार्थ्यांची ही करामत असल्याचे समोर आले आहे. एवढ्या मोठ्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मार्क कसे प्राप्त केले? यामागे कोणती एजन्सी किंवा एजंट सामील होता? याचा तपास सुरू असल्याचे राठोड यांनी स्पष्ट केले.


IELTS - एक आंतरराष्ट्रीय प्रमाणित चाचणी, कठोर परिश्रम करावे लागतात.
आयईएलटीएस ही  इंग्रजी भाषा अस्खलित बोलणाऱ्यांसाठी एक आंतरराष्ट्रीय प्रमाणित चाचणी आहे, ज्यामध्ये अनेक देशांतील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चांगल्या गुणांची आवश्यकता असते. राठोड म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनाही आयईएलटीएसमध्ये 5 किंवा 6 बँड मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात. मेहसाणातील वेगवेगळ्या गावांतील रहिवासी असलेले हे चार विद्यार्थी 6.5 ते 7 च्या दरम्यान गुण मिळवण्यात यशस्वी झाले, तरीही त्यांना इंग्रजीत संवाद साधता आला नाही. ध्रुव पटेल, नील पटेल, उर्विश पटेल आणि सावन पटेल या चार विद्यार्थ्यांनी 25 सप्टेंबर 2021 रोजी दक्षिण गुजरातमधील नवसारी शहरातील एका केंद्रावर आयईएलटीएसची परीक्षा दिली आणि मार्च रोजी विद्यार्थी कॅनडाला गेले होते. 


काहीतरी नक्कीच संशयास्पद होते
परीक्षेसाठी नियुक्त केलेल्या नवसारी येथील बँक्वेट हॉलच्या व्यवस्थापकाने सांगितले की, परीक्षा निरीक्षकांनी परीक्षेपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते. यावरून हे सिद्ध होते की पारदर्शकता नव्हती आणि काहीतरी नक्कीच संशयास्पद होते. परीक्षा आयोजित करण्यासाठी अधिकृत असलेली एजन्सी अहमदाबाद येथे आहे, असं राठोड म्हणाले. अहमदाबादच्या साबरमती परिसरात असलेल्या एजन्सीच्या मालकांना चौकशी सुरू असलेल्या संबंधित कागदपत्रांसह 48 तासांच्या आत मेहसाणा एसओजीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


 


 


 


 


 


 


 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI