Adar Poonawalla meets Health Minister : जगभरासह भारतातही मंकीपॉक्स विषाणूचा प्रार्दुभाव वाढताना दिसत आहे. मंकीपॉक्स विषाणूवर लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाचे (Serum Institute of India) सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री (Health Minister) यांची बैठक पार पडली. मंगळवारी अदर पुनावाल यांनी माहिती देत सांगितलं की, देशातील मंकीपॉक्स विषाणूचा वाढता संसर्ग पाहता सीरम इंस्टिट्यूटकडून लसीचं संशोधन सुरु आहे. याबाबत पुनावाला यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे. 


देशात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सचे आठ रुग्ण आढळले आहेत. दिल्लीमध्ये मंगळवारी 35 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आयसीएमआर (ICMR) म्हणजेच इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चच्या (Indian Council for Medical Research) पुणे (Pune) येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेने (NIV-National Institute of Virology Lab) एका रुग्णाच्या नमुन्यांमधून मंकीपॉक्स विषाणूला (Monkeypox Virus) वेगळं केलं आहे. यामुळे मंकीपॉक्स विषाणूविरोधी लस बनवण्यात मदत होणार आहे.


आयसीएमआरने 27 जुलै रोजी इच्छुक भारतीय लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना विषाणूचा नमुन्यांवर अभ्यास करत मंकीपॉक्स विषाणूवरील लस विकसित करण्यासाठी आवाहन केलं आहे. सरकारने लस निर्मिती कंपन्यांना विषाणूवरील लस आणि टेस्टिंग किट तयार करण्याचं आवाहन केलं आहे. यामध्ये मंकीपॉक्स विषाणूच्या नमुन्यामुळे मदत होणार आहे. देशात मंकीपॉक्सचा वाढता संसर्ग पाहता या परिस्थितीवर नजर ठेवण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. याआधीच जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंकीपॉक्स विषाणूला जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर करत चिंता व्यक्त केली आहे.


मंकीपॉक्सवर लवकरच येणार लस


सीरम इन्स्टिट्यूटचे (SII) सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं आहे की, 'लवकरच मंकीपॉक्स लस उपलब्ध होईल. त्यावर संशोधन सुरु आहे. गेल्या काही महिन्यांपासून मंकीपॉक्सचा विषाणू जगातील अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. आता भारतातही मंकीपॉक्स विषाणूची अनेक प्रकरणं समोर आली आहेत, अद्याप अनेक रुग्णांचा अहवाल येणं बाकी आहे. सीरमकडून लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. काही महिन्यांत लस उपलब्ध होईल.'