आठपेक्षा जास्त हजार-पाचशेच्या बनावट नोटा आढळल्यास कारवाई
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 06:16 PM (IST)
मुंबई : पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करुन मोदींनी काळ्या पैशांबाबत सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता बँकाही पुढे सरसावल्या आहेत. आठपेक्षा जास्त बनावट नोटा सापडल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत. जर त्यांच्याकडे आठपेक्षा जास्त बनावट नोटा आढळल्या तर त्यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली जाणार आहे. एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी ही माहिती दिली आहे. जुन्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या व्यक्तीकडे एक-दोन बनावट नोटा आढळल्या तर कारवाई केली जाणार नाही. मात्र आठ किंवा त्यापेक्षा जास्त नोटा आढळल्या तर कारवाई होऊ शकते. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एसबीआयमध्ये दीड कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. जवळपास 12 लाख ग्राहकांनी नोटा बदलून घेतल्या आहेत. नवीन मशिनमध्ये नव्या नोटांचे प्रोग्राम फीड करेपर्यंत विलंब होईल. आठवडाभर पाचशेच्या नोटा मिळणार नाहीत. त्या परिस्थितीत दोन हजार रुपयांच्या नोटा दिल्या जातील.