मुंबई : ही वेळ आहे बदलाची. बदल हाच मुळी आपल्या जीववनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कसाठीही ही बदलाचीच वेळ आहे. परिणामी आता 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलणार आहे. ABP Network आता नवी झेप घेण्यासाठी या टप्प्यातून जात आहे.


अमर्याद राहण्याच्या आमच्या या भूमिकेमुळं दर्शकांप्रती आमची जबाबदारी, दायित्व दाखवून देते. शिवाय वैचारिक दृष्टीकोन विस्तारत आपल्याल कल्पना आणि विश्वासाकडे पाहण्याचा एक मार्ग आम्ही या प्रयत्नांतून देऊ इच्छितो. भारत हा एक असा देश आहे जेथे अमर्याद कौशल्य आणि क्षमता आहे. पण, अंशिक आणि काही मर्यादित माहितीमुळं मात्र भ्रमाच्या भींती
उभ्या राहिल्या आहेत. ज्यामुळं बौद्धित बंधनं समोर येऊन खऱ्या कौशल्याला वाव देता येत नाही.


हा बदल अखंड असेल आणि जगाकडे पाहण्याचा एक विस्तीर्ण दृष्टीकोन लाभेल. मोकळ्या मनानं विचार करण्याची एक अतिशय उत्तम आणि तितकाच भीतीदायक बाब म्हणजे तुमच्या बाबतीतील असुरक्षितता. पण, ABP Network नं कायमच धोका पत्करत माध्यम क्षेत्रातील बदलांना समजून घेतलं आहे. सातत्यानं बदलणाऱ्या 'कंझम्पशन मॉडेल'च्या दृष्टीनं आमच्या ब्रँडमध्ये काही उल्लेखनीय सुधारणा करण्यात आल्या आहेत.


ABP Networkची नवी ओळख असणार आहे या ब्रँडचा नवा लोगो. अर्थात एक अशी ओळख ज्या माध्यमातून आमचा दृष्टीकोन, ध्येय्य आणि समाजाला अविरतपणे माहिती पुरवण्याचा आमचा अट्टहास सर्वांपर्यंत अधिक प्रभावी आणि प्रत्यय़कारीपणे पोहोचणार आहे. ज्या माध्यमातून अतिशय तंतोतंत आणि विश्वासार्ह माहिती दर्शकांपर्यंत पोहोचणार आहे. ABP Networkनं कायमच युजर्स फर्स्ट या तत्वावर विश्वास ठेवला आहे. या बदलाच्या निमित्तानं एकंदर अनुभवच बदलेल असं नाही, तर नागरिकांसमवेत नागरिकांसाठीच असणाऱ्या या संस्थेचं नातं आणखी दृढ होणार आहे.