नवी दिल्ली: देशातील आघाडीची मीडिया कंपनी एबीपी नेटवर्कने सोमवारी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) इंदूर सोबत एक सामंजस्य करार (MoU) केला. हा करार दोन्ही संस्थांमधील शैक्षणिक सहकार्याच्या माध्यमातून माहितीपूर्ण आणि खुल्या समाजाच्या विकासासाठी योगदान देऊन त्यांना मजबूत बनवणारा आहे. या कराराननुसार एबीपी नेटवर्क आणि आयआयएम इंदूर हे बनावट बातम्यांचे सामाजिक आणि मनोवैज्ञानिक विश्लेषण करून त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी प्रतिबंधात्मक यंत्रणा तयार करतील.
ही भागीदारी खोट्या आणि बनावट बातम्यांशी लढण्यासाठी त्यात असलेल्या वैयक्तिक स्तरावरील हस्तक्षेप आणि त्याच्या विश्लेषणावर लक्ष केंद्रित करेल. या भागीदारीच्या माध्यमातून एबीपी नेटवर्क आणि आयआयएम एकमेकांच्या मदतीने माहितीपूर्ण आणि खुल्या समाजाच्या निर्मितीला चालना देईल आणि यासाठी आवश्यक साधने आणि प्रक्रिया तयार करण्यावर संयुक्तरित्या संशोधन करतील. याशिवाय भारतातील नागरिकांना डिजिटल साक्षर करण्यासाठी जागरुकता मॉडेलही विकसित करील. या भागीदारीअंतर्गत एबीपी नेटवर्क आणि आयआयएम इंदूर दोन्हीकडील कर्मचाऱ्यांसाठी अल्पकालिक प्रशिक्षण/संशोधनाच्या संधीही उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय दोन्ही संघटना एकमेकांच्या हितासाठी संयुक्त परिसंवादाचेही आयोजन करणार आहेत.
या भागीदारीबाबत बोलताना एबीपी नेटवर्कचे सीईओ श्री. अविनाश पांडे यांनी सांगितले, ‘’या करारामुळे आगामी वर्षांमध्ये आम्ही आयआयएम इंदूरसोबत व्यावसायिक संबंधांची आशा करीत आहोत. एबीपी नेटवर्क नेहमीच माहितीपूर्ण आणि खुल्या समाजाच्या वाढीसाठी वचनबद्ध असून ते वचन आम्ही पूर्ण करीत आहोत. ही भागीदारी करण्याचा आमचा उद्देश्य बनावट बातम्यांना मुळापासून नष्ट करून जनतेला जागरुक करणे आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ही भागीदारी मुख्य प्रवाहातील माध्यमांच्या संशोधनात मोठी कामगिरी बजावेल.’’
यावेळी आयआयएम इंदूरचे संचालक प्रा. हिमांशू राय यांनी म्हटले की, ‘’आयआयएम इंदूर आणि एबीपी नेटवर्क हा एमओयू साईन करीत आहे त्याचा मला खूप आनंद होत आहे. आयआयएम इंदूरच्या मिशन स्टेटमेंटमध्ये समाजाची जागरूकता प्रामुख्याने आहे. त्याअंतर्गतच एबीपी नेटवर्कचे देशभर पसलेले जाळे आणि आयआयएम इंदूरची बौद्धिक उत्कृष्टता एकत्र येऊन आम्ही एक जागरुक राष्ट्र निर्माण करण्याचा पाया घालत आहोत. याअंतर्गत सर्वप्रथम आम्ही बनावट बातम्यांवर संशोधन करून त्याचे निवारण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या मते बनावट बातम्यांचा परिणाम केवळ व्यक्तिगत, मानसिक स्तरावर पडत नाही तर सामाजिक एकता आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्रभावित करणारा ठरू शकतो. आणि आमचा प्रवास येथून सुरु होत आहे.’’
एबीपी नेटवर्कसंबंधी
एबीपी नेटवर्क एक आधुनिक मीडिया आणि कंटेंट क्रिएशन कंपनी असून ब्रॉडकास्ट आणि डिजिटल क्षेत्रातील विश्वासाचे नाव आहे. एबीपी नेटवर्कच्या बहुभाषिक वाहिन्या असून देशभरातील 535 मिलियन प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या आहेत. एबीपी नेटवर्कची कंटेंट इनोव्हेशन शाखा एबीपी क्रिएशन्सच्या अंतर्गत असलेला एबीपी स्टुडियोज बातम्यांच्या वर्तुळाबाहेर जात मूळ आणि उत्कृष्ट कंटेंट क्रिएट करून त्याची निर्मिती आणि लायसेंस करतो. एबीपी नेटवर्क, एबीपीची एक शाखा असून याची सुरुवात जवळजवळ 100 वर्षांपूर्वी झाली आणि आज भारतातील एक अग्रणी मीडिया हाऊसच्या रुपात स्वतःला अत्यंत मजबूतीने स्थापित केलेले आहे.