NBDA : एबीपी नेटवर्कचे सीईओ अविनाश पांडे (Avinash Pandey) यांची न्यूज ब्रॉडकास्टर अँड डिजिटल असोसिएशन (News Broadcasters & Digital Association) अर्थात एनबीडीएच्या (NBDA) अध्यक्षपदी (President) निवड करण्यात आली आहे. याआधी त्यांनी एनबीडीएचे उपाध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळला असून आता त्यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. इंडिपेंडंट न्यूज सर्व्हिसेस प्रा. लिमिटेडचे (Independent News Services Pvt. Ltd.) चेअरमन रजत शर्मा (Rajat Sharma) हे याआधी अध्यक्ष होते.

  


मातृभूमी प्रिंटिंग अँड पब्लिशिंग कंपनी लिमिटेडचे (Mathrubhumi Printing & Publishing Co. Ltd.) ​​व्यवस्थापकीय संचालक एम.व्ही. श्रेयांस कुमार (MV Shreyams Kumar) यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.  तर 2022-23 वर्षासाठी NBDA एनबीडीएच्या खजिनदार म्हणून न्यूज 24 ब्रॉडकास्ट लिमिटेडच्या (News24 Broadcast India Ltd.) व्यवस्थापकीय संचालक नुराधा प्रसाद शुक्ला (Anuradha Prasad Shukla) यांची निवड करण्यात आली आहे. एनबीडीए बोर्डाच्या आज (16 सप्टेंबर) झालेल्या बैठकीदरम्यान या सर्व नियुक्त्या करण्यात आल्या.
अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर अविनाश पांडे म्हणाले, ''सध्या न्यूज इंडस्ट्री ज्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये आहे, त्या काळात अध्यक्षपद मिळणं ही माझ्यासाठी एक मोठी जबाबदारी आहे. रजत शर्मा यांनी आतापर्यंत आमचे ज्याप्रकारे नेतृत्व केले त्यासाठी त्यांचे मी आभार मानतो. यापुढेही आम्ही सर्व बोर्डाचे सदस्य मिळून समाजासाठी योग्य काम नक्कीच करु.''  


कोण आहेत अविनाश पांडे?


अविनाश पांडे हे 2005 सालापासून ABP समुहामध्ये विविध भूमिका बजावत आहेत. अविनाश पांडे यांनी जानेवारी 2019 मध्ये एबीपी नेटवर्कच्या सीईओ पदाचा पदभार सांभाळला असून त्यांना न्यूज मीडियामध्ये तब्बल 26 वर्षांचा अनुभव आहे. 


कोण आहेत NBDA बोर्डचे सदस्य?


टाईम्स नेटवर्कचे एम.के. आनंद (M.K. Anand), TV18 ब्रॉडकास्ट लिमिटेडचे राहुल जोशी (Rahul Joshi), इनाडू टेलिव्हिजन प्रायव्हेट लिमिटेडचे आय. वेंकट, TV Today नेटवर्कच्या कल्ली पुरी भंडल (Kalli Purie Bhandal), NDTV, नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेडच्या सोनिया सिंह आणि झी मीडियाचे अनिल मल्होत्रा हे सर्वजण बोर्डाचे सदस्य असणार आहेत.