एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 24/06/2017


1.    राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं कर्ज माफ, फडणवीस सरकारचा ऐतिहासिक निर्णय, 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार, कर्जमाफीला 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना' असं नाव https://goo.gl/h6RPXB

2.    कर्जमाफीला केवळ सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी पात्र, आजी-माजी मंत्री, टॅक्स भरणारे आणि व्यापाऱ्यांना वगळलं, मुख्यमंत्र्यांची माहिती https://goo.gl/h6RPXB

3.    शेतकरी कर्जमाफीचा परिणाम सातव्या वेतन आयोगावर होणार नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण, सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा https://goo.gl/h6RPXB

4.    सलगच्या सुट्ट्यांमुळे आजपासून तीन दिवस बँका बंद, रोखीचे व्यवहार करणाऱ्यांना पैशांची चणचण भासण्याची शक्यता https://goo.gl/eovzbm

5.    औरंगाबादचे वीरपुत्र संदीप जाधवांवर केळगावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार, तर कोल्हापूरच्या श्रावण मानेंनाही गोगवेमध्ये अखेरची मानवंदना https://goo.gl/9LUrWL

6.    मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱ्याबाबत माहिती मागवणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला वाटाण्याच्या अक्षता, परदेश दौऱ्याचा तपशील देण्यास प्रशासनाची टाळाटाळ https://goo.gl/E4jv7Q

7.    खासगी वाहनांनाही 'स्कूल बस' परमिट मिळणार, राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती https://goo.gl/wM7wDT

8.    पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांना स्वाईन फ्ल्यूचा विळखा, गर्भवतीसह 10 जणांचा मृत्यू, 285 जणांना स्वाईन फ्लूची लागण https://goo.gl/Y9NV64

9.    मुंबईतील भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा मृत्यू, अधिकाऱ्याच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप, संतप्त कैद्यांचं आंदोलन https://goo.gl/suUATa

10.    मध्य रेल्वेवरील रविवारच्या विशेष ब्लॉकमुळे एक्स्प्रेसवर परिणाम, डेक्कन क्वीन, पंचवटी एक्स्प्रेस रद्द, 6 तासांसाठी लोकल सेवा बंद राहणार, डोंबिवली ते बदलापूरदरम्यान मेगाब्लॉक https://goo.gl/u9DjRr

11.    मान्सूनच्या तोंडावर ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर सेलचा बंपर धमाका, अनेक ठिकाणी 80 टक्क्यांपर्यंत सूट https://goo.gl/ruH2D1

12.    विठू माऊलीच्या जयघोषात पालख्या पंढरीच्या दिशेने, ज्ञानोबांच्या पालखीचं नीरास्नान, तर तुकोबांची पालखी बारामती मुक्कामी http://abpmajha.abplive.in/live-tv/

13.    ‘आप’ला निवडणूक आयोगाचा झटका, 21 आमदारांवर निलंबनाची टांगती तलवार, संसदीय सचिवपदी बेकायदीर नियुक्ती भोवण्याची शक्यता https://goo.gl/uk8H8B

14.    पंतप्रधान मोदी अमेरिकेसह तीन देशांच्या दौऱ्यावर रवाना, पहिल्यांदाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेट होणार https://goo.gl/pXxKX2

15.    बॉक्स ऑफिसवर 'ट्यूबलाईट' पेटलीच नाही, सलमानच्या सिनेमाला पहिल्या दिवशी केवळ 21.15 कोटींची ओपनिंग, ईदच्या मुहूर्तावर सर्वात कमी कमाई करणारा सिनेमा https://goo.gl/s66UBM

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर