ABP Ideas of India Live : 'एबीपी'वर देशाच्या विकासाचा रोडमॅप; दिग्गजांसोबत संवाद

ABP Ideas of India Summit 2022 Day 1 Live : एबीपी नेटवर्कच्या व्यासपीठावर दिग्गजांसोबत संवाद, आमीर खान, गौर गोपाल दास यांचीही उपस्थिती, एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर आज आणि उद्या आयडीयाज ऑफ इंडिया समिट

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 26 Mar 2022 08:04 PM
मी अभिनेता नसतो तर साधू झालो असतो, नवाझुद्दिन सिद्दिकीने केला अनेक गोष्टींचा खुलासा

अभिनेता नवाझुद्दिन सिद्दिकी म्हणाला आहे की, ''मी अभिनेता झालो नसतो तर साधू झालो असतो. मी दोन ते तीन वेळा धर्मशाळेत जाऊन साधू बनण्याचा प्रयत्न देखील केला.''

भारत 2030 पूर्वी 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो, नीती आयोगच्या उपाध्यक्षांनी वर्तवली शक्यता

नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहेत की, ''जर कोरोनाची चौथी लाट आली नाही, तर भारतीय अर्थव्यवस्था 8 टक्के दराने वाढेल. तसेच पुढील आठ वर्षांपेक्षा कमी कालावधीत भारताची अर्थव्यवस्था दुप्पट होऊ शकते. अशा परिस्थितीत 2030 पूर्वी भारत 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठू शकतो.''

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणे गायले

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे गाणेच योग्य आहे, असं तो म्हणाला आहे. यावेळी त्याने एबीपीच्या मंचावर हे गाणे सादर देखील केले. याशिवाय त्यांनी यापूर्वी 'आज जाने की जिद ना करो' गाऊनही प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. आजच्या काळातील कच्चा बदाम आणि बचपण का प्यार या गाण्यांबाबत तो म्हणाला की, मी हे सर्व ऐकलं नाही, संगीतात जे चांगले आहे. ते कायम राहील आणि जे निरुपयोगी आहे, ते नाहीसे होईल, असे मला वाटते.

मी आजकाल गुलजारसाहेबांना भेटतोय- पपॉन

प्रसिद्ध गीतकार गुलजार यांच्याबद्दल बोलता पपॉन म्हणाला आहे की, आजकाल गुलजारसाहेबांना भेटल्यावर त्यांनी जे सांगितले होते. ते आठवते की, 'लकीरें हैं रहने दो- किसी ने खींची थी.' ... मात्र संगीतासोबत रेषाही पुसल्या जातात आणि दुरावाही संपतो. संगीत संस्कृतींमध्ये भेदभाव करत नाही आणि संगीतामध्ये कोणामधीलही अंतर भरून काढण्याची ताकद आहे. यावेळी त्याने एक कुमाओनी गाणे गायले. जे आसाममधील पहाडी गाणे म्हटले जाते. 

माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं : पपॉन

या कार्यक्रमात बोलता पपॉन म्हणाला आहे की, ''माझ्या पहिल्या गाण्यानंतर मला 3 वर्षे दुसरे कोणतेही गाणे मिळाले नाही. म्हणून मला वाटले की कदाचित माझ्या आवाजात बॉलीवूड वाली बात नसेल. मात्र याशी मला कोणतीही अडचण नव्हती. करण माझं कोणतंही बॉलीवूड ड्रीम नव्हतं. मी जेव्हाही आसाममध्ये गायचो तेव्हा असे म्हटले जायचे की, मी येथील मुलगा आहे, तर गाणारच. मात्र मी दिल्लीचा आभारी आहे की, इथल्या लोकांना माझा आवाज आवडला. मी इथे बँडसोबत कामही केलं.''

ओटीटी प्लॅटफॉर्मबद्दल काय म्हणाला करण जोहर?

करण जोहर म्हणाला की, ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट प्रदर्शित करण्याचे मुख्य कारण म्हणजे कोविड महामारीमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि यामुळे चित्रपट निर्मात्यांना बरेच निर्णय बदलावे लागले. 'शेरशाह' ऑगस्टमध्ये आला जेव्हा देशात कोरोनाची मोठी रुग्ण संख्या होती. असे असूनही या चित्रपटाने चांगली कमाई केली. यावरून दिसून येते की प्रेक्षक चित्रपटगृहात येत नसतानाही, भारतात चित्रपटांसाठी एक जागा आहे. परिस्थिती अनुकूल असती तर हा सिनेमा चित्रपटगृहात नक्कीच प्रदर्शित झाला असता. पण तसे होऊ शकले नाही. 

'कुछ कुछ होता है'बद्दल करण जोहर म्हणाला

या कार्यक्रमात बोलताना करण जोहर म्हणाला आहे की, 'कुछ कुछ होता है' मध्ये त्याने त्या सर्व चित्रपटांमधील गोष्टींचा वापर केला आहे. जो तो लहानपणापासून पाहत आला आहे. तो म्हणाला आहे की, ''हा चित्रपट मी खूप मनापासून आणि प्रेमाने बनवला आहे. विशेषत: तरुणांना हा चित्रपट खूप आवडला आणि मी उघडपणे सांगू शकतो की हा माझा सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे.''

आता बॉलीवूड, टॉलीवूड हे शब्द वापरण्याऐवजी 'इंडियन फिल्म इंडस्ट्री' म्हणावं: करण जोहर

चित्रपट दिग्दर्शक आणि चित्रपट निर्माता करण जोहर सध्या ABP Ideas of India च्या मंचावर बोलत आहे. करण जोहर म्हणाला की, ''आता भारतीय चित्रपट उद्योगाला बॉलीवूड म्हणणे बंद केले पाहिजे. कारण हा हॉलीवूडच्या आधारे बनलेला शब्द आहे, जो बॉम्बेला जोडून बॉलिवूड झाला. आता याचे नाव  'इंडियन फिल्म इंडस्ट्री' असायला हवे. कारण यात तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड सिनेमांचा समावेश आहे आणि याचे उदाहरण 'पुष्पा' सारख्या चित्रपटातून पाहायला मिळते.''

ABP Ideas of India: माझं नाव खान असल्याने मला पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला जातो - कबीर खान, बॉलीवूड दिग्दर्शक

Kabir Khan: बॉलीवूडचे तीन मोठे दिग्दर्शक कबीर खान, आनंद एल राय आणि नागेश कुकुनूर यांनी आज एबीपी आयडियाज ऑफ इंडिया (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. यावेळी या तिन्ही दिग्दर्शकांनी चित्रपटांमधील वाद आणि सोशल मीडियावरील चर्चेवर आपले मत मांडले आहे. या कार्यक्रमात बोलताना आपल्या राष्ट्रवाद आणि देशभक्तीबद्दल कबीर खान म्हणाले की, ''माझे नाव खान असल्याने मला अनेक लोक 'गो टू पाकिस्तान' म्हणतात. मी एकदा पाकिस्तानात गेलो होतो. मात्र तेथील लष्कराने मला गो टू इंडिया म्हणाले. मी ना इथला राहिलो ना तिथला.''

ABP Ideas of India: 'गुजरातमधून चार लोक बाहेर पडले आहेत, दोन विक्रेते आणि दोन खरेदीदार': भूपेश बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शनिवारी  एबीपी आयडियाज ऑफ इंडिया (ABP Ideas of India Summit 2022) कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यांना विचारण्यात आले की, 2024 च्या निवडणुकीत छत्तीसगड मॉडेल भाजपच्या गुजरात मॉडेलला मागे टाकेल का? यावर ते म्हणाले आहेत की, "गुजरात मॉडेलबद्दल आता कोणीही बोलत नाही. गुजरातने देशाला खूप काही दिले आहे. महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे पुत्र दिले आहेत. देशाची एकता आणि अखंडता राखण्यात सरदार पटेल यांची सर्वात मोठी भूमिका होती. मात्र आता गुजरातमधून चार लोक बाहेर पडले आहेत. दोन विक्रेते आणि दोन खरेदीदार. त्यावेळी झालेली सर्व बांधकामे आता विकली जात आहेत.''

ABP Ideas of India: ममता ही लहान बहिणीसारखी आहे, मात्र नाते टिकवण्यासाठी आरसा दाखवणे गरजेचं आहे : बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर

एबीपी आयडियाज ऑफ इंडिया समिट 2022 च्या दुसऱ्या दिवशी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर आणि शशी थरूर यांनीही हजेरी लावली. यावेळी राज्यपाल जगदीप धनखर यांनी पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जगदीप धनखर म्हणाले की, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे काम संविधानाचे रक्षण करणे आहे. या दोन्ही पदांच्या शपथविधीही खूप वेगळ्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांच्याबद्दल बोलता ते म्हणाले आहेत की, ''ममता बॅनर्जी माझ्या लहान बहिणीप्रमाणे आहेत. 30 वर्षांपूर्वी त्यांना दुखापत झाल्यावर मी त्यांना भेटण्यासाठी पश्चिम बंगालला गेलो होतो. मात्र असे असले तरी कधीकधी नातेसंबंध टिकवण्यासाठी लहान बहिणीला देखील आरसा दाखवणे गरजेचं आहे.''

ABP Ideas Of India : ही खुप दुख:द बाब आहे की, आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांबद्दल पक्ष चर्चा करतो, पण त्यांचे विचार समजून घेत नाही: सुधींद्र कुलकर्णी

ABP Ideas Of India : एबीपी न्यूजच्या आयडियाज ऑफ इंडिया या कार्यक्रमामध्ये अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. सुधींद्र कुलकर्णी (Sudheendra Kulkarni) यांनी सध्याच्या राजकारणावर त्यांचे मत व्यक्त केलं. ते म्हणाले, ही खुप दुख:द बाब आहे की, आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांबद्दल पक्ष चर्चा करतो, पण त्यांचे विचार समजून घेत नाही.

'द काश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात...

'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करण्याच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, असे चित्रपट करमुक्त करण्याची गरज नाही. कारण लोक स्वतः पैसे खर्च करून हा चित्रपट पाहणार आहेत. कोणताही चित्रपट बनवण्याचा अधिकार निर्मात्यांना आहे आणि त्याचा ते वापरत  करतात, असे आमचे मत आहे. पण सरकारला प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 




ABP Ideas Of India: हिंदुत्वावरून विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं उत्तर

ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेनेची स्थापना केली. त्यावेळी शिवसेना आक्रमक होती. मात्र, आता शिवसेनेला अशी भूमिका बजावण्याची गरज आहे का? या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी शिवसेनेची स्थापना झाली. त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती. मात्र, आताची परिस्थिती वेगळी आहे. जेव्हा आक्रमतेची गरज लागेल, तेव्हा शिवसेना त्यांच्या भाषेत उत्तर देईल. 

ABP Ideas Of India: पर्यटन मंत्रालयाबाबत आदित्य ठाकरेकाय म्हणाले?

पर्यटन आणि पर्यावरण बदल घडवण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. जगभरात पर्यटनावर अधिक भर दिला जातो. यांमुळं अनेकांना रोजगार मिळतो, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

धारावीमध्ये विकासकामांची गरज

मुंबईतील धारावीमध्ये विकासकामे करण्याची गरज करण्याची गरज आहे.

'आयडियाज ऑफ इंडिया समिट' कार्यक्रमात आदित्य ठाकेरेंची उपस्थिती

'आयडियाज ऑफ इंडिया समिट' कार्यक्रमात आदित्य ठाकेरेंची उपस्थिती दर्शवली दर्शवली आहे. या क्रायक्रमात त्यांनी विविध मुद्द्यावर भाष्य करायला सुरुवात केलीय. 


 

ABP Ideas Of India : एबीपी माझा समिटमध्ये सोनम वांगचूक यांची हजेरी

लडाखमध्ये शिक्षण क्षेत्रात मोलाचं योगदान करणारे इंजिनिअर सोनम वांगचूक जगभरात प्रसिद्ध आहे. आपल्या नव्या अविष्कार आणि कल्पनांबाबत जाणून घेतलं. त्यांनी आज ABP Ideas Of India या कार्यक्रमात हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी भारताचं भविष्य आणि इतर मुद्द्यांवर संवाद साधला. 

ABP Ideas Of India : स्वप्नामागे जर संकल्प असेल आणि त्यामागे आपण जाऊ, तर काहीही शक्य आहे : कैलास सत्यार्थी

ABP Ideas Of India : सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून, देशाच्या उज्ज्वल भविष्याबद्दल त्यांचे विचार शेअर करणार आहेत.


या सत्राची सुरुवात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी (Kailash Satyarthi) यांच्या संवादाने झाली. नोबेल पारितोषिक विजेते कैलाश सत्यार्थी यांनी एबीपी न्यूजच्या ‘आयडियाज ऑफ इंडिया समिट 2022’मध्ये सहभाग घेतला. त्यांनी 'द ह्युमनिटी इंडेक्स' या विषयावर चर्चा केली. कैलाश सत्यार्थी म्हणाले की, भारताचा खरा विकास तेव्हाच होईल जेव्हा सर्वांना समान शिक्षण मिळेल. त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या रांगेत उभ्या असलेल्या प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचे कामही आम्ही करू. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

ABP Ideas Of India : आपल्या देशात दशलक्ष समस्या असल्या तरी आपल्याकडे एक अब्ज उपाय देखील आहेत : कैलास सत्यार्थी

ABP Ideas Of India : आपल्या देशात दशलक्ष समस्या असल्या तरी आपल्याकडे एक अब्ज उपाय देखील आहेत : नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी

ABP Ideas Of India : 'आयडियाज ऑफ इंडिया समिट' सुरू; दिग्गजांसोबत चर्चासत्र

ABP Ideas Of India : स्वातंत्र्याच्या 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. सध्या हा कार्यक्रम एबीपी माझा आणि एबीपी न्यूजवर लाईव्ह सुरु आहे. 

ABP Ideas Of India : एकाच मंचावर एकवटणार देशभरातील दिग्गज

ABP Ideas Of India : प्रमुख वक्त्यांमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi), सोनम वांगचुक (Sonam Wangchuk), प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das), इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती (N.r. Narayana Murthy), प्रसिद्ध पत्रकार फरीद झकेरिया (Fareed Zakaria), काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor), पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा समावेश असेल. शिक्षण जगताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार, लीड सीईओ सुमित मेहता आणि अपग्रेडचे सह-संस्थापक फाल्गुन कोंपली करतील.

ABP Ideas Of India : एबीपी नेटवर्कच्या व्यासपीठावर दिग्गजांसोबत संवाद, आमीर खान, गौर गोपाल दास यांच्यासह कपिल देव यांची उपस्थिती

ABP Ideas Of India : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्तानं एबीपी नेटवर्कनं आज आणि उद्या असे दोन दिवस आयडियाज ऑफ इंडिया' समिट आयोजित केलीय. या समिटमध्ये देशातील  प्रभावशाली व्यक्ती आपले विचार मांडणार आहेत.  संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील मान्यवर  या मंचावर पाहायला मिळणार आहेत. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल भाष्य करतील आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचं व्हिजन मांडतील. आज आणि उद्या होणाऱ्या या समिटमध्ये आमीर खान, गौर गोपाल दास, कपिल देव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. एबीपी लाईव्ह डॉट कॉमवर आज आणि उद्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे.

पार्श्वभूमी

ABP Ideas Of India : सध्या देश स्वातंत्र्याचं 75वं वर्ष साजरं करत आहे. स्वातंत्र्याची 75 गौरवशाली वर्षानिमित्त ABP नेटवर्क विविध क्षेत्रातील भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणत आहे. ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) समिटमध्ये संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रापासून तंत्रज्ञान, व्यवसाय आणि राजकारण अशा विविध क्षेत्रातील विचारप्रवर्तक लोक आणि उत्कृष्ट विचारसरणी या मंचावर पाहायला मिळणार आहे. हे दिग्गज भारताच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलणार असून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी दृष्टी शेअर करणार आहेत. 


'आयडियाज ऑफ इंडिया' समिटमध्ये मुक्त विचारांच्या थीमसह, कॉन्क्लेव्हमध्ये दररोज किमान 10 सत्रं असतील. ज्यामध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गज त्यांच्या कौशल्याच्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतील. दोन्ही दिवशी सकाळी 10 वाजल्यापासून समिट सुरू होईल. 25 आणि 26 मार्च रोजी होणार्‍या ABP नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया समिट'ची पहिलं सत्र भारतासाठीच्या नवीन कल्पनांबद्दल बोलण्यासाठी एक व्यासपीठ आहे. 


प्रमुख वक्त्यांमध्ये नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी (Kailash Satyarthi), सोनम वांगचुक (Sonam Wangchuk), प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास (Gaur Gopal Das), इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती (N.r. Narayana Murthy), प्रसिद्ध पत्रकार फरीद झकेरिया (Fareed Zakaria), काँग्रेस खासदार शशी थरूर (Shashi Tharoor), पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Jagdeep Dhankhar) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा समावेश असेल. शिक्षण जगताचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी सुपर 30 चे संस्थापक आनंद कुमार, लीड सीईओ सुमित मेहता आणि अपग्रेडचे सह-संस्थापक फाल्गुन कोंपली करतील.


याव्यतिरिक्त कपिल देव, जफर इक्बाल आणि लिएंडर पेस खेळाबद्दल बोलतील. मनोरंजन जगतातील उषा उथुप आणि गायकांमध्ये नवीन वयाचे कलाकार पेपॉन आणि जसलीन रॉयल, व्हायोलिन वादक एल सुब्रमण्यम, चित्रपट दिग्दर्शक कबीर खान (Kabir Khan), आनंद एल राय, नागेश कुकुनूर आणि रमेश सिप्पी आणि अभिनेते तापसी पन्नू, अभिनेता आमिर खान यांचा समावेश असेल.


'एबीपी आयडीयाज ऑफ इंडिया समिट' कुठे पाहाल? 


'एबीपी आयडीयाज ऑफ इंडिया समिट'चं तुम्ही abplive.com वर आज आणि उद्या थेट प्रक्षेपण पाहू शकता

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.