Gujarat Election Opinion Poll 2022: गुजरात विधानसभेच्या निवडणुका (Gujarat Assembly Election 2022) या वर्षी डिसेंबरमध्ये होणार आहेत. देशभराचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं आहे. यावेळच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा कोणता? सी-व्होटरच्या सर्वेक्षणात विचारलेल्या या प्रश्नाच्या उत्तरात लोकांनी अनेक समस्या सांगितल्या आहेत. परंतु बहुतांश लोकांनी बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या असल्याचे सांगितले आहे.
गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबर रोजी दिवशी मतदान होणार आहे. मतमोजणी 8 डिसेंबर रोजी होणार आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रचाराला लागले आहेत. गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई पार पडणार आहे. बहुमतासाठी 92 जागा जिंकायच्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या आधी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वे केला आहे.
या निवडणुकीत सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता ठरेल?
बेरोजगारी - 33.4 %
वीज,पाणी- 18.2 %
शेतीचे प्रश्न- 14.7%
भ्रष्टाचार - 5.5 %
इतर - 28.2 %
मतदानात कोणते मुद्दे निर्णायक ठरतील?
धार्मिक ध्रुवीकरण - 18.8 %
राष्ट्रवाद - 27.1%
मोदी-शाह - 16.6%
राज्य सरकार कामगिरी - 16.2%
आपची एन्ट्री -16.5%
स्थानिक मुद्दे - 4.8%
एकूण 182 जागांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई
गुजरातमध्ये एकूण 182 जागांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई पार पडणार आहे. बहुमतासाठी 92 जागा जिंकायच्या आहेत. दरम्यान, निवडणुकीच्या आधी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर लोकांचे मत जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी-व्होटरने एक सर्वे केला आहे. या सर्वेनुसार भाजपच सर्वात मोठा पक्ष ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला 45.4 टक्के मतं मिळतील आणि तब्बल 135 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेतून व्यक्त करण्यात आला आहे. या सर्वेनुसार भाजप पुन्हा एकदा गुजरातमध्ये एकहाती सत्ता स्थापन करेल, असा अंदाज आहे. आपची चर्चा असली तरी या सर्वेनुसार दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस राहणार असल्याचा अंदाज आहे. काँग्रेसला 35 जागा मिळतील तर आपला 11 जागा मिळतील असा सर्वेचा अंदाज आहे.
टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
ही बातमी देखील वाचा