Arvind Kejriwal: पंजाब विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्ष दिल्ली महापालिकेवर झेंडा फडकावण्यासाठी सज्ज झालाय. याच पार्श्वभूमीवर दिल्ली महापालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यावरून अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर शाब्दिक हल्ला चढवलाय. भाजपनं वेळेवर या निवडणुका घेतल्या आणि त्या जिंकल्या तर, आम आदमी पक्ष राजकारण सोडेल, असं आव्हान अरविंद केजरीवाल यांनी भाजपला दिलंय.
दरम्यान, भाजपाला आव्हान देताना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, " भाजप स्वतःला जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणवतो. पण त्यांना दिल्लीतील एका छोट्या पक्षाची भीती वाटते. तुम्ही दिल्लीच्या निवडणुकीला घाबरलात, तुमच्यात हिंमत नाही. हिंमत असेल तर निवडणुका वेळेत घ्या आणि जिंकून दाखवा. तुम्ही निवडणुका जिंकल्या तर, आम आदमी पक्ष राजकारण सोडेल." अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, निवडणुका टाळता येऊ शकतात? पराभवाच्या भितीनं भाजप निवडणुका पुढे ढकलत आहेत. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हात जोडून विनंती आहे की, उद्या भाजप असेल किंवा नाही, आम आदमी पक्ष असेल किंवा नाही. मोदीजी असतील किंवा नाही. केजरीवाल असतील किंवा नाही. परंतु, देश वाचलं पाहिजे. दिल्ली महापालिकेची निवडणूक पुढे ढकलणं हा इंग्रजांना देशातून हाकलून देशात लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अपमान आहे. निवडणुका नाही झाल्या तर, देशात लोकशाही कशी टीकेल? आज सर्वात जास्त दुख भगतसिंह यांच्या आत्म्यास झालं असेल, ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. एखादं सरकार येईल आणि निवडणुकाचं संपवून टाकेल. काय हाच दिवस पाहण्यासाठी त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं का? असाही प्रश्न अरविंद केजरीवाल यांनी त्यावेळी उपस्थित केलाय.
हे देखील वाचा-
- Hijab Row : हिजाब प्रकरणाचा परीक्षेशी काहीही संबंध नाही, तात्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार
- Crime News : आईने शिकवलं 'गुड टच, बॅड टच'; 9 वर्षाच्या मुलीने बलात्कारी शिक्षकाचे फोडले बिंग
- The Kashmir Files बाबत सोशल मीडियावर पोस्ट, तरुणाला नाक घासायला लावून व्हिडीओ व्हायरल केला!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha