गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ताकदीने उतरत आहे. त्या पार्श्वभूमीवर आपने आपल्या जाहीरनाम्यात अनेक सोई-सुविधांचा उल्लेख केला आहे.
यामध्ये गोव्या फ्री वाय-फाय झोनपासून जलवाहतुकीपर्यंत अनेक मुद्दे आहेत.
'आप'चा जाहीरनामा
- कचरा समस्या सोडवणार
- गोवा फ्री वाय फाय झोन करणार
- जलवाहतूक सुरु करणार
- बस वाहतूक दर्जा वाढवणार
- एससी,एसटी साठी नोकऱ्या राखीव ठेवणार,
- आदिवासी क्षेत्र अधिसूचीत करणार,
- प्रादेशिक आराखडा निकालात काढणार,
- वाडा क्लिनिकमध्ये मोफत उपचार उपलध करून देणार
- गोमेकॉमध्ये खाटा वाढवणार,एम्सच्या धर्तीवर सेवा देणार
- सरकारी नोकऱ्या वेळेत भरणार
- दुग्ध उत्पादनात गोव्याला स्वयंपूर्ण करणार
- टॅक्सी चालकांचे प्रश्न सोडवणार
- रस्ते अपघात कमी करण्यासाठी रस्ते सुधारणार
- प्रत्येक घराला 20 हजार लिटर मोफत पाणी देणार
- इंग्रजी माधमाच्या शाळांचे सरकारी अनुदान सुरु ठेवणार
- दाबोळी विमानातळाचा विस्तार करून तो सुरु ठेवणार