सोलापुरात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब, जागावाटपावर घोडं अडलं, 30 तारखेला अंतिम निर्णय


-----------------------------------


निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का, माजी विरोधीपक्ष नेते देवेंद्र आंबेरकर शिवसेनेत जाणार, उद्या 'मातोश्री'वर पक्षप्रवेश करणार, आंबेरकर कामत गटाचे समर्थक मानले जातात


--------------------------------


औरंगाबाद - वैजापुरात पंकजा मुंडेंच्या सभेत स्टेज कोसळला, पंकजा मुंडे सुखरुप, सभा पुन्हा सुरु


--------------------------------



नाशिक: घोटी टोलनाक्यावर जळगावच्या नायब तहसीलदारांना चोरट्यांनी लुटलं, विकास लाडवंजारी यांच्याकडील मोबाईल, रोकड लंपास


हेडलाईन्स

--------------------------------

1.  भाजपचा आज मुंबईत विजय संकल्प मेळावा, युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे राज्याचं लक्षं

--------------------------------

2. गेल्या 25 वर्षांपासून भाजप पाठीत खंजीर खुपसतंय, सामनातून सेनेचा पुन्हा हल्लाबोल, तर युतीत सडल्याची टीका अत्यंत चुकीची, गडकरींनी सुनावलं

--------------------------------

3. भाजपसोबत काडीमोड झाल्यानंतर मनसेकडून शिवसेनेला युतीचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती, जागांबाबत कुठलीही अट नाही

--------------------------------

4. युती तुटल्याचा फायदा शिवसेनेला होण्याची शक्यता, 'माझा'च्या नेट सर्व्हेत जनतेचा कौल शिवसेनेच्या बाजूनं

--------------------------------

5. औरंगाबादेतील प्राध्यापिका स्मिता यादव यांची आजारपणाला कंटाळून आत्महत्या, 8 वर्षीय मुलीलाही विहिरीत फेकून मारण्याचा प्रयत्न

--------------------------------

6. जम्मू-काश्मीरमधील हिमस्खलनात महाराष्ट्रातील 3 जवानांचा मृत्यू, बीड आणि अकोल्यावर शोककळा, शोकाकूल कुटुंब पार्थिवाच्या प्रतीक्षेत

--------------------------------

एबीपी माझा वेब टीम