जयपूर : जयपूरमधील जयगडमध्ये सुरु असलेल्या 'पद्मावती' चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. राजपूत समाजाशी संबंधित करणी सेना या संघटनेने हा हल्ला केला.


चित्रीकरणादरम्यान पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंहवर काही दृश्यं चित्रित करण्यात येत होती. ही दृश्यं चुकीची असल्याचं सांगत करणी सेनेने त्याचा निषेध केला.

जयगड किल्ल्यात भन्साळी यांच्या सिनेमाचं शूटिंग सुरु असतानाच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तिथे येऊन निषेध केला.  त्यांनी सेटवरील सामानाचीही तोडफोड केली. तसंच संजय भन्साळी यांच्या थोबाडात मारली. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.



राणी पद्मावती यांची प्रतिमा आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने या सिनेमात दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने विरोध केल्याचं करणी सेनेकडून सांगण्यात येत आहे.

करणी सेनेने याआधीही हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय यांच्या 'जोधा अकबर' सिनेमालाही विरोध केला होता. करणी सेना स्वत:ला राजपूतांच्या हितांची रक्षक असल्याचं सांगते. करणी सेना राजस्थानमध्ये काम करते.

दरम्यान, राम गोपाल वर्मा, करण जोहर, श्रेया घोषाल यांच्यासह बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी संजय लीला भन्साळी यांच्यावरील हल्ल्याचा ट्विटरवरुन निषेध केला आहे.

https://twitter.com/RGVzoomin/status/825020020057108481

https://twitter.com/shreyaghoshal/status/825079581438771201

https://twitter.com/karanjohar/status/825013203100856320

https://twitter.com/FarOutAkhtar/status/825079087693709312