लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपचा महामेरु रोखण्यासाठी अखिलेश यादव आणि राहुल गांधी एकत्र आले आहेत. यूपी निवडणुकामध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने युती करण्याची घोषणा केली आहे.


लखनौमध्ये सप आणि काँग्रेसने एकत्रित घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली. समाजवादी पक्ष 298 जागा लढवणार आहे, तर 105 जागांवर काँग्रेस उमेदवार देणार आहे.

अखिलेश यादव आणि मुलायमसिंह यांच्यातील 'यादवी' काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आली होती. त्यानंतर पक्षाचं अधिकृत चिन्ह अखिलेश यांच्या पदरात पडलं.

उत्तर प्रदेशात सात टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. 11 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे.