LIVE : बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना आयकरची नोटीस
एबीपी माझा वेब टीम | 20 Nov 2016 07:10 AM (IST)
हेडलाईन्स : 1. इंदूर-पाटणा एक्स्प्रेसचे 14 डबे रुळावरुन घसरले, 20 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी 2. कोल्डप्लेच्या कार्यक्रमात राष्ट्रध्वजाचा अपमान झाला, राष्ट्रवादी काँग्रेसचा गंभीर आरोप, ख्रिस मार्टिननं तिरंगा खिशात खोचल्यावर आक्षेप 3. नोटबंदीनंतर बँकेत मोठी रक्कम जमा करणाऱ्यांना आयकर विभागाची नोटीस, बँकेनं दिलेल्या माहितीनंतर आयकर विभागाच्या कारवाईला सुरुवात 4. सहकारी बँकांवरचे निर्बंध उठवले नाहीत तर सरकारमधून बाहेर पडू, शिवसेनेचा नवा इशारा, सहकारी बँका बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप 5. काळ्या पैशाचा तिटकारा असलेले मोदी निवडून कसे आले, राज ठाकरेंचा जळजळीत सवाल, विचाराअंती निर्णय न घेतल्याचाही घणाघात 6. कोहलीच्या जबाबदार खेळीनं विशाखापट्टणम कसोटीची सूत्रं पुन्हा भारताच्या हाती, तिसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाची एकूण आघाडी 298 धावांची