LIVE : राज्यभरात ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा
एबीपी माझा वेब टीम | 19 Jan 2017 07:19 AM (IST)
हेडलाईन्स --------------- सातारा : अभिनेते सयाजी शिंदेंनी लावलेली शेकडो झाडं तोडणारा आप्पा मदने अटकेत, पांढरवाडीत अटक ---------------------------------------------- शिर्डी : ज्येष्ठ कॉम्रेड नेते आणि माजी आमदार पी.बी कडू पाटील यांचे निधन, 97 व्या वर्षी राहुरी तालुक्यात सोनगावमधील राहत्या घरी अखेरचा श्वास ---------------- पुण्यात अप्पर इंदिरानगरमध्ये बांबुच्या वखारीला आणि शेजारील कंपनीला आग, अग्नीशमन दल घटनास्थळी ----------------- औरंगाबादमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची पक्षातून हकालपट्टी ------------- 1. युतीसाठी भाजपचा 50-50 चा फॉर्म्युला, भाजप-शिवसेना अपेक्षित वॉर्डांच्या याद्या एकमेकांना देणार, जागावाटपावरुन घासाघीस सुरु --------------- 2. पुणे, नाशिकसह राज्यभरात ज्वेलर्सवर आयकर विभागाचा छापा, नोटाबंदीच्या काळात मोठे व्यवहार झाल्याचा संशय --------------- 3. मुंबईतील पश्चिम द्रुतगती मार्गावर रात्री तेलाच्या टँकरला अपघात, रस्त्यावर तेलच तेल, काही काळ वाहतूक विस्कळीत --------------- 4. जलीकट्टूवरील बंदी तातडीनं उठवा, चेन्नईच्या मरीना बीचवर आंदोलकांची मोठी गर्दी, आंदोलकांना ताब्यात घेतल्यानं जनक्षोभ --------------- 5. प्रो रेसलिंग लीगच्या आखाड्यात बाबा रामदेव, ऑलिम्पिक रौप्यविजेत्या पैलवानांसोबत दोन हात --------------- 6. इंग्लंडविरोधातील 3 वनडे सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी विराटसेना सज्ज, आज कटकमध्ये दुसरा वन डे सामना --------------- एबीपी माझा वेब टीम