हेडलाईन्स


1. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्याला बँक मॅनेजरने संगणकाचा मॉनिटर फेकून मारला, यवतमाळच्या पाटणबोरी एसबीआय शाखेतील घटना, बँक मॅनेजरवर गुन्हा दाखल

------------------

2. पाटबंधारे विभागातील लिपीक महिलेची आत्महत्या, औरंगाबादेतल्या उच्चशिक्षित कुटुंबातील घटनेने खळबळ, प्राध्यापक नवऱ्यासह चार जणांवर गुन्हा

------------------

3. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान तरुणीला ट्रेनमधून फेकलं, महिला डब्ब्यात घुसण्यास विरोध केल्याने तरुणाचं कृत्य, आरोपी पोलिसांच्या ताब्यात

------------------

4. मुंबईतील अनधिकृत झोपड्यांना अधिकृतपणे पाणी मिळणार, महापालिकेत शिवसेना-भाजपचा यू टर्न, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र तटस्थ

------------------

5. तूरडाळीची लागवड करणाऱ्यांना हेक्टरी अनुदान देण्याचा विचार, गिरीष बापट यांची नाशकात घोषणा, तुरीचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा

------------------

6. माध्यमिक आणि उच्च-माध्यमिक शिक्षकांची भरती सरकार करणार, संस्थाचालकांच्या खाबूगिरीला वेसण लावण्यासाठी रामबाण उपाय, शिक्षणसम्राटांचं धाबं दणाणलं

------------------

7. एनडीएच्या काळात एस्सार ग्रुपने सुरेश प्रभू, अंबानींसह पीएमओचे फोन टॅप केले, इंडियन एक्स्प्रेसचं खळबळजनक वृत्त, पंतप्रधान कार्यालयाकडे रितसर तक्रार

------------------

8. भारतीय हवाई दलात आज इतिहास घडणार, फायटर पायलट म्हणून पहिल्यांदाच महिला दाखल होणार, तीन महिला कॅडेटची पहिली बॅच सज्ज

------------------

9. चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद, पेनल्टी शूटऑऊटमध्ये भारताचा3-1 ने पराभव, पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या भारताला रौप्यपदक

------------------

10. झिम्बाब्वेत आजपासून ट्वेन्टी-20ची लढाई, हरारेत पहिला सामना, विजयी दौड कायम राखण्याचा धोनी ब्रिगेडचा निर्धार

------------------

एबीपी माझा वेब टीम