-------------
पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे वर पुन्हा वाहतूककोंडी... पुण्याहून मुंबईच्या दिशेने पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा एक विचित्र अपघात झाला. आडोशी बोगड्याजवळ चार वाहनं एकमेकांवर आदळली. दोन ट्रक, एक स्विफ्ट आणि एक होंडा सिटी यांच्यात हा अपघात झाला. सकाळी साडे सातच्या सुमारास हा अपघात झाला, सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी एक प्रवासी गंभीर जखमी आहे.
पुण्याहून मुंबई दिशेने तब्बल पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. सध्या वाहतूक संथ गतीने सुरु असून, ती पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागू शकतो
-------------
हेडलाईन्स
पनवले : शिरढोणजवळील टायर गोदामाला पहाटे आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
-------------------
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ चार गाड्यांचा विचित्र अपघात, वाहतूक धिम्या गतीने, 5-6 किमी रांगा
-------------------
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ चार गाड्यांचा विचित्र अपघात, वाहतूक धिम्या गतीने सुरु
-------------------
1. मुंबई रस्ते घोटाळा प्रकरणात अटकेची पहिलीच मोठी कारवाई, दहा लेखापरीक्षकांना अटक, कंत्राटदारांची बिलं न पडताळल्याचा आरोप
-------------------
2. लॉटरी घोटाळ्याची चौकशी करुन कारवाई करु, माझाच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन तर जाणूनबुजून टार्गेट केलं जात असल्याची राष्ट्रवादीचा आरोप
-------------------
3. साडेचार हजार कोटीच्या पीकविम्यातील साडेतीन हजार कोटी मराठवाड्यात, बीडमध्ये एकाच कुटुंबाला 75 लाखाचा विमा, जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश
-------------------
4. सुप्रीम कोर्टाच्या दिलाशानंतरही दिघ्यात कमलाकर इमारत रिकामी केली, कॅम्पाकोलासाठी गळा काढणारे राजकीय पक्ष सुमडीत, रहिवाशांचा संताप
-------------------
5. शिवसेना आमदार सदा सरवणकर अडचणीत, शूटिंग करणाऱ्यावर उचललेला हात महिलेला लागला, तर यवतमाळमध्ये शिवसैनिकाची गुंडगिरी
-------------------
6. उडता पंजाबला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट, चित्रपट उद्या प्रेक्षकांच्या भेटीला, इंटरनेटवर लीक झाल्याचीही चर्चा
-------------------
7. तासाभराच्या विमान प्रवासासाठी फक्त अडीच हजार मोजा, नव्या विमान वाहतूक धोरणाला मंजुरी, विमान प्रवास मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात
-------------------
8. पाच बँका एसबीआयमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव मंजूर, कॅबिनेटच्या बैठकीत निर्णय, 2017 पर्यंत प्रक्रिया पूर्ण होणार
-------------------
एबीपी माझा वेब टीम