हेडलाईन्स


----------------

1 जेएनयूत डाव्या संघटनांचं निर्विवाद वर्चस्व, अभाविपला धूळ चारत चारही जागांवर विजय, मोहित पांडेच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ

----------------------

2 माझ्यावर बंदी घातली तर भारत असहिष्णू होईल, झाकीर नाईकचं भारत सरकारला खुलं पत्र, राजीव गांधी फाऊंडेशनच्या देणगीवरुनही वाद

----------------------

3 बीएमसी भ्रष्टाचार वाद प्रकरणावरुन कपिल शर्माचं घूमजाव, फक्त काळजी व्यक्त केल्यानं अनावश्यक वाद उद्भवला, कपिलची सारवासारव

-----------------------------

4 नांदेड पोलिसांकडून असंवेदनशीलतेचा कळस, हद्दीच्या वादात अज्ञाताचं प्रेत 7 तास रेल्वे रुळाजवळ पडून

-------------------------

5 सुट्ट्यांच्या दिवसांत एक्स्प्रेस वेवर गोल्डन अवर्स , वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांची शक्कल, अवजड वाहनांना बंदी

-------------------

6  13 महिन्यांपासून बंद असलेलं परळी औष्णिक केंद्र लवकरच सुरू होणार, जायकवाडीतून सोडलेलं पहिल्या टप्यातील पाणी उद्यापर्यंत मिळणार

----------------------

7 ट्रायल रनमध्ये लालबागची राणी पास, वडाळा ते लोअर परेलदरम्यान मोनो रेल्वेची यशस्वी चाचणी, लवकरच सेवा सुरू होण्याची चिन्ह

------------------

8 एबीपी माझाचा महामोदक सिद्धीविनायकाच्या चरणी अर्पण, विनोद तावडेंसह रितेश देशमुखांची हजेरी, रंगारंग कार्यक्रमानं सांगता

-------------------

एबीपी माझा वेब टीम