हेडलाईन्स


जायकवाडी धरणातील पाण्यावर हिरवा तवंग, तपासणीची मागणी, प्रशासनातर्फे नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन

-----------------------

1 नाशिकच्या तळेगावमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, 15 वर्षीय आरोपीला अटक, संतप्त जमावाकडून जाळपोळ, रास्तारोको, परिस्थिती नियंत्रणात

--------------------------

2 माझा आसाराम बापू करण्याची धमकी, ऑडिओ क्लीपनंतर नामदेवशास्त्रींचा आरोप, पंकजा मुंडेंच्या भाषणालाही तीव्र विरोध

--------------------------

3 पंकजा मुंडेंना गडावर भाषण करु द्या, 25 गावच्या सरपंचांची मागणी, तर धनंजय मुंडेंचीही दसरा मेळावा वादात उडी

------------------

4 समान नागरी कायद्यासाठी हालचालींना वेग, लॉ कमिशन जाणून घेणार नागरिकांची मतं, कौटुंबिक कायद्यात समानता आणण्यासाठी महत्त्वाचं पाऊल

-------------------

5 हिंगोलीत परतीच्या पावसाचा कहर, अनेक भागात पाणी शिरलं, लातूरमध्ये जोरदार पाऊस, शेतीपिकांचं मोठं नुकसान

---------------------

6 दसऱ्याच्या मुहूर्तावर महिलावर्गासाठी खूषखबर, सोन्याच्या दरात तब्बल 900 रुपयांची घट, खरेदीसाठी सराफा बाजारात गर्दी

------------------

7 गाझियाबादेत वायूसेनेच्या 84 व्या वर्धापनदिनी चित्तथरारक कसरती, तेजस, सुखोई विमानांची लक्षवेधी प्रात्यक्षिकं

-------------------

8 इंदूर कसोटीत कर्णधार विराट कोहलीचं शतक साजरं, भारतीय कर्णधाराचं कसोटी क्रिकेटमधलं तेरावं शतक

--------------------

एबीपी माझा वेब टीम