LIVE : मुंबईत युको बँकेच्या फोर्ट शाखेत आग
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 01:55 AM (IST)
हेडलाईन्स ------------ 1 आराध्य दैवत गणरायाच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज, घरोघरी आणि मंडळांमध्ये बाप्पा होणार विराजमान, माझावर गणेशोत्सवाची बित्तंबातमी ------------ 2 गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी कडेकोट बंदोबस्त, तर सिद्धिविनायक, गणेशगल्ली, लालबाग राजाच्या पहिल्या आरतीला भाविकांची रिघ ---------------- 3 कोकणात बाप्पांच्या आगमनाला पंरपरेचा साज, एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दीड लाखांहून अधिक घरांमध्ये होणार गणरायाची प्रतिष्ठापना --------------- 4 रिलायन्सच्या बहुचर्तित जिओ सेवेची आजपासून सुरुवात, देशभरातील दोन लाख स्टोअर्सद्वारे फोरजी सीम ग्राहकांना उपलब्ध होणार ------------- 5 दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांना वाळीत टाका, मोदींचा ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसमोर पाकिस्तानला टोला ------------------------- 6 काश्मीरातल्या शांततेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची श्रीनगरमध्ये बैठक, मात्र आमंत्रण देऊनही हुर्रियत पक्षांच्या नेत्यांची गैरहजेरी ------------------------- एबीपी माझा वेब टीम