हेडलाईन्स


छगन भुजबळ यांचे सीए सुनील नाईक माफीचा साक्षीदार होणार, ईडीची माहिती

 

मेपलच्या सचिन अग्रवालला 8 जूनपर्यंत दिलासा, पुढील आठवड्यात 9, 11, 13 मे रोजी सकाळी 10 ते 1 मध्ये हजेरी लावावी लागेल
त्यानंतर शनिवार रविवार हजेरी लावावी लागणार

#‎विरार‬ : बांधकाम व्यावसायिक शंकर मधू वटवकर यांची आत्महत्या, कौटुंबिक कारणातून गळफास घेतल्याचा सुसाईड नोटमध्ये उल्लेख

---------------

पाणी प्रश्नाचं राजकारण करुन नका, गिरीष बापटांचं आवाहन, इंदापूरला अर्धा टीएमसी पाणीच दिलं, त्यामुळे पुणेकरांनी काळजी करु नये, बापटांचा सल्ला

---------------

देशातली सर्वात मोठी ई-कॉमर्स वेबसाईट आयआरसीटीसी हॅक, एक कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा चोरीला

---------------

1. कांदा उत्पादकांच्या मदतीसाठी केंद्र सरकार धावलं, 15 हजार टन कांदा खरेदी करणार, नाशिकमधून कांद्याच्या खरेदीला सुरुवात

---------------

2. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा पर्याय नाही, उद्धव ठाकरेंच्या मागणीला खडसेंचं प्रत्युत्तर, शिवसेना सत्तेतील विरोधक असल्याचंही वक्तव्य ---------------

3. प्रचंड विरोधानंतरही दौंडसाठी खडकवासलातून एक टीएमसी पाणी सोडलं, बापटांच्या कार्यालयाला पोलिस संरक्षण, राष्ट्रवादीत दोन गट ---------------

4. घोटाळेबाज कंत्राटदारांवर मुंबई महापालिका मेहरबान, काळ्या यादीतील चार कंपन्यांना कंत्राटं, भाजप आणि शिवसेनेत वाकयुद्ध

---------------

5. माझं ओरिजनल राज ठाकरे व्हायला भाग पाडू नका?, मनसे अध्यक्षांचा नगरसेवकांना इशारा, पक्षाच्या संदीप देशपांडेंनी मात्र वृत्त फेटाळालं

---------------

6. संभ्रमाच्या परिस्थितीत आज एमएच-सीईटीची परीक्षा, तर नीट विरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

---------------

7. वॉटर कप स्पर्धेतील गावकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमीर खान अमरावतीमध्ये, भल्या पहाटे आमीरचं श्रमदान सुरु

---------------

8. ऑगस्टा वेस्टलॅन्डच्या मुद्यावर आज लोकसभेत हिंदीतून आक्रमक व्हा, मोदींनी पर्रिकरांना सूचना दिल्याची सुत्रांची माहिती

---------------

9. नागराज मंजुळेच्या तक्रारीनंतर 'सैराट'च्या पायरसी प्रकरणी पुण्यात पहिला गुन्हा दाखल, चित्रपट मोबाईलमध्ये कॉपीकरुन देताना रंगेहात पकडलं

---------------

10. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाचा प्रवास आता आत्मचरित्राच्या रुपात, सानियाचं 'एस अगेन्स्ट ऑड्स' पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार

---------------

एबीपी माझा वेब टीम