LIVE : HDFC बँकेच्या डेबिट अथवा क्रेडीट कार्डवरुन खरेदी केलेल्या इंधनावर मध्यरात्रीपासून चार्ज लागू
एबीपी माझा वेब टीम | 08 Jan 2017 07:32 AM (IST)
आज मध्यरात्रीपासून HDFC बँक आपल्या डेबिट अथवा क्रेडीट कार्डवरुन खरेदी केलेल्या इंधनावर 0.25% पासून ते 1% पर्यंत चार्ज आकारणार ----------------------------------- हेडलाईन्स : चार बायका आणि 40 पोरांचा विचार करणाऱ्यांमुळे लोकसंख्या वाढली, भाजपच्या साक्षी महाराजांचं बेताल वक्तव्य, मेरठ पोलिसांकडून गुन्हा दाखल ---------------- नातेवाईकांना तिकीटं मिळावीत म्हणून दबाव टाकू नका, भाजप कार्यकारिणीत मोदींनी सुनावलं, नोटाबंदी ऐतिहासिक निर्णय असल्याचा पुनरुच्चार ------------ युती करायची असेल तर सर्व महापालिका किंवा सर्व जिल्हा परिषदांमध्ये करा, नाही तर युती कठीण, शिवसेनेचा भाजपला इशारा ------------ सीमेवर असणारे जवान बाळु चौगुलेंचं घर ग्रामपंचायतीकडून जमीनदोस्त, मांडवगण फराटा गावातील घटना, मंत्री आणि नेत्यांकडूनही जवान बाळु चौगुलेंची उपेक्षा ------------------ आज नगरपरिषदांच्या चौथ्या टप्प्यातील निवडणुका, नागपूरच्या 9 तर गोंदियातील 2 नगरपरिषदांचा समावेश ------------------- हजारो कर्मचाऱ्यांची देणी थकवणाऱ्या खंबाटा एव्हिएशनविरोधात गुन्हा दाखल, जप्तीच्या कारवाईला कंपनीकडून अडथळा, कामगार मंत्र्यांचा कठोर कारवाईचा इशारा ------------- सांगलीतील बलात्कार प्रकरणी अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई, नांगरे-पाटलांचा इशारा, तर नागपुरात टुली पब्लिक स्कूलमध्ये स्वयपाक्याकडून मुलींचा विनयभंग ----------- बुलेट ट्रेनमुळे महाराष्ट्र आर्थिक पारतंत्र्यात जाईल, नारायण राणेंचा आरोप, तर राज्याला 3 लाख कोटीच्या कर्जात ढकलणाऱ्यांच्या उलट्या बोंबा, भाजपचा पलटवार