यंदा बारावीची परीक्षा 28 फेब्रुवारी ते 25 मार्च, तर दहावीची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च या कालावधीत घेतली जाणार
---------------------
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ अधिवेशनात अविश्वास ठराव मांडणार, सूत्रांची माहिती
---------------------
लातूरमध्ये पिण्याच्या पाण्यातून 40 जणांना विषबाधा, हौदातून सूडबुद्धीने विषारी द्रव्य मिसळल्याचा गावकऱ्यांना संशय
हेडलाईन्स :
1. महापौर पदासाठी शिवसेनेनं मागितलेल्या मदतीला काँग्रेसचा नकार, संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट, महापौर म्हणून लहान पक्षांचा स्वतंत्र उमेदवार देण्याची घोषणा
2. मतदार यादीतील घोळाप्रकरणी शिवसेना न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार, अनिल देसाईंची माहिती, मुंबईतल्या मतदार याद्यांमधून 11 लाख नावं गायब
3. राज्य सरकार अस्थिर होईल हे शहाणपण भाजपला आधी का सुचलं नाही? गडकरींना शिवसेना नेते अनिल परब यांचा सवाल, कुणीही अस्पृश्य नसल्याचं वक्तव्य
4. मी हिटलरशाही नव्हे तर गांधीवाद मानणारा नेता, सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर निशाणा, मुलगा सागरचा प्रचार न केल्याप्रकरणी संताप व्यक्त
5. प्रशांत परिचारकांच्या वक्तव्यावरुन पुणे विद्यापीठात अभाविप-एसएफआय भिडली, अटक करण्यात आलेल्यांची जामिनावर सुटका, विद्यापीठाला पोलीस छावणीचं स्वरूप
6. 'लिपस्टिक अंडर माय बुरखा'ला यूए सर्टिफिकेट देण्यास सेन्सॉर बोर्डाचा नकार, वादग्रस्त दृश्यांमुळे विशिष्ट समाजाच्या भावना दुखावण्याचा आरोप
7. स्टीव्ह ओ'कीफच्या फिरकी आक्रमणासमोर टीम इंडियाचं पुन्हा लोटांगण, पुण्याच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 333 धावांनी दणदणीत विजय