LIVE: सांगलीत वडील आणि मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न
एबीपी माझा वेब टीम | 08 Oct 2016 07:42 AM (IST)
BREAKING : सांगलीत वडील आणि मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न, एकतर्फी प्रेमातून तरुणांकडून दोघांनाही त्रास भगवान गडावर मेळाव्यांना परवानगी देऊ नये, नामदेव शास्त्रींचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र -------------------- मुंबई : मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाड, सीएसटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत.. -------------------- पंकजा मुंडेंकडून पदाचा गैरवापर, राजीनामा द्यावा, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंची मागणी, नामदेवशास्त्रींना धमकी दिल्याचा पंकजांवर आरोप ------------------ कोपर्डी बलात्कार प्रकरणातील तिघांवर आरोपपत्र दाखल, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा आरोप, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार --------------------- 2018 पर्यंत भारत-पाकिस्तानची पूर्ण सीमा सील करणार, केंद्रीय गृहमंत्र्यांची महत्वपूर्ण घोषणा, पाकच्या कुरघोड्यांवर जालीम उपाय ---------------- सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्यांनी शहिदांचा अपमान केला, राहुल आणि केजरीवालांवर शहांची टीका, तर तुरुंगात गेलेल्यांनी शिकवू नये, काँग्रेसचा पलटवार ----------------- कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष युआन सान्तोस यांना शांततेचं नोबेल, गृहयुद्ध रोखण्यासाठीच्या कार्याचा जागतिक स्तरावर गौरव ------------------- कोल्हापूरच्या अंबाबाईसाठी तिरुपतीहून मानाचा शालू, महावस्त्राची वाजत-गाजत मिरवणूक, भाविकांचीही मोठी गर्दी ------------------ भारत आणि न्यूझीलंडमधली आज तिसरी कसोटी, तिसऱ्या कसोटीतही विजय मिळवून भारत व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत