सोलापूर : आहेरवाडी येथील एनटीपीसी प्रकल्पात चार कामगारांचा मृत्यू, बॉयलर अंगावर पडल्याने चौघे जागीच ठार. कामगारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु. मृत्युमुखी पडलेले चारही कामगार बिहारचे




---------------

राजधानी दिल्लीत सतर्कतेचा इशारा, जम्मू काश्मीरमधून 2 दहशतवादी दिल्लीकडे निघाल्याची शक्यता, दिल्लीत कडेकोट सुरक्षा

---------------

1) पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईकला दुजोरा, पाकिस्तानी सुरक्षा तज्ज्ञाचा दाव्यानं पाकचे दात घशात, कारवाईत पाकिस्तानी सैनिकही जखमी झाल्याचा दावा

--------------

2) भाजपकडून शहिदांच्या रक्ताचं राजकारण, राहुल गांधींचा हल्लाबोल, तर सर्जिकल स्ट्राईक आधीही झाले, पण गवगवा केला नाही, पवारांचा टोला

---------------

3) शहीद जवानांच्या परिवाराचा जरा तरी विचार करा, सर्जिकल स्ट्राईकचं राजकारण करणाऱ्यांवर अक्षयकुमार बरसला

-------------------

4) कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता, विरोधकांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांकडून दखल

------------

5) भाजपच्या कार्यकारिणीत मराठा आरक्षणाचा ठराव एकमताने मंजूर, आघाडीतील मराठा नेत्यांनी स्वत:चे खिसे भिरले, भाजप कार्यकारिणीत चंद्रकांतदादांची टीका

------------

6) महापालिकांच्या प्रभाग रचनेची आज आरक्षण सोडत, पुणे, नाशिक, नागपूरसह आठ महापालिकेतील चित्र स्पष्ट होणार

------------

7) बिहारचा सिंघम महाराष्ट्रात येणार, आयपीएस शिवदीप लांडेंची महाराष्ट्रात प्रतिनियुक्ती, पुढील तीन वर्षासाठी राज्यात पोस्टिंग

------------

8) फिल्मी पडद्यावर आज बाळासाहेबांचा रुबाब, फॅमेली कट्टाही भेटीला, तर हिंदीत मिर्झियाची उत्कंठा

-------------