छिंदवाड : मध्य प्रदेशाच्या छिंदवाड्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. कार पुढे नेण्याच्या अट्टाहासामुळे पुलावरुन ही कार वाहून गेली. छिंदवाड्यातील सौंसर गावात ही घटना घडली


कार वाहून गेल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अंबाघाट नदीचा आहे. इथे 27 जून रोजी झालेल्या तुफान पावसामुळे नदीला पूर आला आणि पाणी नदीवरुन वाहू लागलं.

तरीही चालकाने फाजील आत्मविश्वास दाखवत कार पुढे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे कार वाहू लागली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार वाहू लागताच आत असलेले चार जण वेळीच उतरले. त्यामुळे सुदैवाने त्यांचा जीव वाचला.

त्यानंतर काही क्षणातच पाण्याच्या जोरदार प्रवाहात गाडी अनेक वेळा उलटसुलट होत वाहू लागली. ही कार 5 किलोमीटर अंतरावर सापडली. पण ही कार कोणाची होती याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पाहा व्हिडीओ