सीकर (राजस्थान): अनके गोष्टींवर थेट मत व्यक्त करणारे प्रवचनकार जैन मुनी तरुण सागर यांनी पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
'पाकिस्तानात जेवढे दहशतवादी नाहीत तेवढे आपल्या देशात गद्दार आहेत.' असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
तरुण सागर यांनी आज राजस्थानमधील पिपराली येथील वैदिक आश्रमात पत्रकारांशी संवाद साधताना आपलं मत मांडलं. 'देशात राहतात, देशाचं खातात आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देतात. मग अशा लोकांना गद्दार म्हणायचं नाही तर काय म्हणायचं?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मागील काही दिवसांपासून जम्म-काश्मीरमध्ये वारंवार लष्करावर दगडफेक करण्यात येत आहे. याबाबतच त्यांनी हे वक्तव्य केलं.
'दहशतवादी सिंहाप्रमाणे समोर वार नाही करत तर तो लांडग्याप्रमाणे मागून हल्ला करतो.' असंही ते म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी भारतातील गरीबीवरही भाष्य केलं. 'भारत हा गरीब देश नाही. तर भारतात असमानता आहे. येथील 100 ते 200 कुटुंबाकडेच सर्वाधिक संपत्ती आहे. त्यामुळेच ही असमानता दिसून येते.'