नवी दिल्ली : सरकारी योजनांच्या लाभासाठी आधार सक्तीचं करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे. मात्र, मोबाईल नंबर आधारला लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

यापूर्वी केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि बँक खात्याशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2017 होती. तर मोबाईल नंबर रिव्हेरिफाय करण्यासाठी 6 फेब्रुवारी 2018 पर्यंत वेळ देण्यात आला होता. पण आता ही मुदतवाढ 31 मार्चपर्यंत करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

तुमचं आधार कार्ड कुठे-कुठे वापरलं जातंय? असं चेक करा

सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या पाच सदस्यीय खंडपीठासमोर गुरुवारी साडे तीन तास सुनावणी सुरु होती. यानंतर कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर, आज कोर्टाने आज आदेश देताना 31 मार्च 2018 पर्यंत मुदतवाढ देण्याचे आदेश दिले आहेत.

मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा

सध्या केंद्र सरकारने सर्व कल्याणकारी योजनांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. याविरोधात सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल आहेत. त्यावर सुप्रीम कोर्टाने आज निर्णय देताना, सरकारी योजनांसाठी आधार सक्तीच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

घरबसल्या तुमचं सिम आधारने व्हेरिफाईड करा

दुसरीकडे, सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय म्हणजे, केंद्र सरकारने काल जारी केलेल्या अध्यादेशावर शिक्कामोर्तब असल्याची चर्चा आहे. कारण केंद्र सरकारने कालच गरजेच्या सेवांसाठी आधार लिंकिंगची मर्यादा 31 मार्चपर्यंत वाढवण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं. त्यानुसार, सुप्रीम कोर्टाने आज आधार लिंकिंगसाठी मुदतवाढ दिली आहे.

बँक खात्याशी आधार लिंक न केल्यास काय होईल?

दरम्यान, केंद्र सरकारने आधार लिंकिंग संदर्भात आत्तापर्यंत 139 अध्यादेश जारी केले आहेत. यात मनरेगापासून ते पेन्शन योजना, प्रॉव्हिडन्ट फंड, पंतप्रधान जन-धन योजना आदींचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

सरकार आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवणार!

आधार लिंकिंगच्या या चार डेडलाईन चुकवू नका!

आधार कार्ड लिंकसाठी मेसेज पाठवून ग्राहकांना घाबरवू नका : सुप्रीम कोर्ट

सिम कार्ड- आधार कार्ड 6 फेब्रुवारीपर्यंत लिंक करा, अन्यथा मोबाईल बंद!

आधार कार्ड अनिवार्य करण्याची मुदत वाढवली

बँक खात्याशी आधार लिंक करणं अनिवार्य, आरबीआयचं स्पष्टीकरण