Aadhaar Card Update Online and Offline : आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाचं कागदपत्र म्हणून वापरलं जातं. आधार कार्ड (Aadhaar Card) 12 अंकी युनिक आयडी नंबर आहे. आधार कार्ड बँक अकाऊंटपासून ते शाळा-कॉलेजमधील प्रवेश सर्वच ठिकाणी फार आवश्यक आहे. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी UIDAI कडून ऑनलाइन आणि ऑफलाइन सुविधा दिली जाते. तुम्ही घरी बसून मोबाईलद्वारे ऑनलाइन काही सुविधा अपडेट करू शकता, पण काही सेवांसाठी तुम्हाला सीएससी केंद्रावर जावं लागेल. 


जर तुम्हाला आधार कार्डमध्ये काही अपडेट करायचे असेल तर तुम्हाला कोणत्या सुविधा ऑनलाइन अपडेट करता येतील आणि कोणत्या सुविधा फक्त ऑफलाइन अपडेट केल्या जाऊ शकतात, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.


घरबसल्या ऑनलाइन करा 'हे' अपडेट्स


आधार कार्डमध्ये अनेक गोष्टी ऑनलाइन अपडेट केल्या जाऊ शकतात. यामध्ये नाव, जन्मतारीख, पत्ता आणि लिंग इत्यादी माहिती तुम्हाला घरबसल्या मोबाईल किंवा संगणकावर ऑनलाइन बदलता येते. त्याचबरोबर UDI ची विशेष सुविधाही आहे, ज्यामध्ये तुम्हाला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर बदलायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्टल वेबसाइटवरून मोबाईल नंबर बदलू शकता.




'ही' कामं मात्र ऑफलाइन करावी लागतील


आधार कार्ड संबंधित काही अपडेट्स मात्र तुम्हाला ऑफलान केंद्रावर जाऊनच कराव्या लागतील. डेमोग्राफिक डेटा व्यतिरिक्त, बायोमेट्रिक डेटा, मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बदलण्यासाठी किंवा अपडेट करण्याचं काम तुम्हाला ऑफलाइनच करावं लागेल. यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्रात जावं लागेल. तुम्ही वेबसाइटद्वारे आधार सेवा केंद्रामध्ये जाण्यासाठी अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता. यामध्ये तुम्हाला डेमोग्राफिक डेटा अपडेट करण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता असेल. बायोमेट्रिक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही.


'या' अपडेट करण्यासाठी शुल्क


जर तुम्ही आधार कार्डमधील मोबाईल नंबर, बायोमेट्रिक डेटा, फोटो यासारख्या गोष्टी बदलल्या तर तुमच्याकडून 30 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत शुल्क आकारलं जाईल.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


फ्री, फ्री, फ्री... आता Aadhaar अपडेटसाठी पैस लागणार नाही; UIDAI ने दिली माहिती