चंदीगड : हरियाणातील सोनीपत येथील खासगी रुग्णालयातील डॉक्टर गौरव सिंग रंधवा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. महिला रुग्णाच्या दोन्ही किडन्या काढल्याचा आरोप डॉक्टरवर आहे. महिलेच्या कुटुंबीयांनी गोंधळ घातल्यानंतर वैद्यकीय मंडळाकडून तपास करण्यात आला. तपासात डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. किडनी काढल्यानंतर डॉक्टरने माफी मागितली होती. डॉक्टरने महिलेच्या पतीला चूक झाल्याचे सांगितले होते. महिलेच्या पतीचे म्हणणे आहे की डॉक्टरने फसवणूक करून त्याची किडनी चोरली आणि पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. ही घटना पाच महिन्यांपूर्वी घडली होती.


महिलेच्या डाव्या बाजूला मुतखडा 


सोनीपत पोस्ट ऑफिसजवळील राजेंद्र नगरमध्ये राहणारे आनंद यांनी सांगितले की, त्यांची पत्नी वीणा राणी यांच्या डाव्या मूत्रपिंडात मुतखडा असल्याने तिला त्रास होत होता. पत्नीवर सोनीपतच्या ट्युलिप हॉस्पिटलचे डॉ. गौरव सिंग रंधवा उपचार करत होते. यावर्षी 27 एप्रिल रोजी डॉ. गौरव सिंह रंधावा यांनी तिला सांगितले की वीणा राणीची डाव्या किडनीला मुतखड्यामुळे पूर्ण नुकसान झाले आहे. शस्त्रक्रियेद्वारे किडनी तातडीने काढावी लागणार आहे.


डॉक्टर म्हणाले, महिलेचे ऑपरेशन यशस्वी


असे न केल्यास पत्नीचा जीवही जाऊ शकतो, असे डॉक्टरांनी सांगितले. डॉ. रंधावा यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी वीणा राणीला 29 एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल केले. यानंतर 1 मे रोजी सकाळी वीणाला ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशनसाठी नेण्यात आले. 2 वाजण्याच्या सुमारास पत्नीला ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आणण्यात आले. ऑपरेशन यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टर गौरव सिंग रंधवा यांनी दिली.


डॉक्टर हात जोडून म्हणाले, चूक झाली


नंतर पत्नीला भेटण्यासाठी ते आयसीयूमध्ये गेले असता त्यांना वीणा अजिबात हलत नसल्याचे दिसले. ते तत्काळ तक्रार घेऊन डॉ.गौरवसिंग रंधवा यांच्याकडे गेले. यावर डॉक्टरांनी त्यांच्या पत्नीचे सर्व रिपोर्ट पुन्हा त्यांच्यासमोर मांडले. रिपोर्ट पाहिल्यानंतर डॉक्टरांनी हात जोडून माफी मागितली आणि आपल्याकडून मोठी चूक झाल्याचे सांगितले. वीणाच्या दोन्ही किडन्या चुकून काढण्यात आल्या आहेत.


रुग्णालयात कुटुंबीयांचा गोंधळ


हे ऐकून मला धक्काच बसल्याचे आनंदने सांगितले. त्यांनी तत्काळ कुटुंबीय आणि मित्रांना याची माहिती दिली. यानंतर कुटुंबीय आणि त्याचे मित्र तात्काळ रुग्णालयात पोहोचले. त्याची बहीण मंजू हिने डायल 112 वर कॉल करून या घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. डॉ. गौरव सिंग रंधावा, ऑपरेशन थिएटरचे कर्मचारी आणि रुग्णालय व्यवस्थापनाने पत्नीची किडनी चोरून खोटे व फसवणूक करून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.


वैद्यकीय पथकाने डॉक्टरांचा निष्काळजीपणा मान्य केला


त्यानंतर या प्रकरणाबाबत आरोग्य विभागाने सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे वैद्यकीय पथक तयार केले. वैद्यकीय मंडळाच्या तपासणी अहवालात डॉक्टरांचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. सेक्टर 27 पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक (एसआय) देवेंद्र यांनी सांगितले की, अहवाल मिळाल्यानंतर डॉ. रंधवा यांच्याविरुद्ध कलम 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे. डॉक्टरला लवकरच अटक करण्यात येईल.


इतर महत्वाच्या बातम्या