3 aircraft crashed in MP, Rajasthan : भारतीय हवाई दलासाठी शनिवार अक्षरश: घातवार ठरला. मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले. मध्य प्रदेशातील अपघातात (Sukhoi-30 and Mirage 2000 aircraft crashed) दोन पायलट सुरक्षित आहेत, तर एकाचा मृत्यू झाला. विमान अपघातातानंतर पायलट बाहेर पडला. त्यानंतर या विमानाचे अवशेष राजस्थानमधील भरतपूरमध्ये त्याचे अवशेष सापडले असल्याची प्राथमिक माहिती आहे.


मध्य प्रदेशात अपघात झालेल्या दोन विमानांनी ग्वाल्हेर एअरबेसवरून उड्डाण केले होते. शनिवारी सकाळी सकाळी हवाई दलाच्या दोन विमानांचे अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली. एकाच दिवशी दोन विमानांचा अपघात झाल्यानंतर हवाई दलाने कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही चौकशीचे आदेश दिले आहेत. राजनाथ सिंह यांनी सीडीएस अनिल चौहान आणि हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी अपघाताची माहिती मागवली आहे. 


दरम्यान, भारतीय हवाई दलाने माहिती देताना सांगितले की, ग्वाल्हेरजवळ आज सकाळी भारतीय वायुसेनेच्या दोन लढाऊ विमानांचा अपघात झाला. हे विमान नियमित ऑपरेशनल फ्लाइंग ट्रेनिंग मिशनवर होते. यात सहभागी असलेल्या ती पायलटपैकी एकाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.


मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 विमान कोसळले


मध्य प्रदेशातील मुरैनाजवळ सुखोई-30 आणि मिराज 2000 अशी दोन विमाने कोसळली. या अपघातानंतर हवाई दलाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी स्थापन केली आहे. दोन्ही विमाने एकमेकांवर आदळली की, आणखी काही कारणामुळे अपघात झाला याची चौकशी केली जाणार आहे. याव्यतिरिक्त, भारतीय वायुसेनेने दोन्ही लढाऊ विमानांची हवेत टक्कर झाली आहे का? हे शोधण्यासाठी देखील तपास सुरू केला आहे. अपघातावेळी Su-30 मध्ये दोन पायलट होते तर मिराज-2000 मध्ये एक पायलट होता. 






दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर स्थानिक प्रशासनाला मदत आणि बचाव कार्यात आयएएफला मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. सीएम चौहान यांनी ट्विटरवर सांगितले की, मी स्थानिक प्रशासनाला जलद बचाव आणि मदत कार्यात हवाई दलाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. विमानांचे पायलट सुरक्षित राहावेत अशी मी देवाला प्रार्थना करतो.


राजस्थानमध्ये भरतपूरमध्ये विमानाचे अवशेष कोसळले 


तत्पूर्वी, राजस्थानमध्ये शनिवारी भरतपूरमध्ये विमान कोसळले. पोलिस अधीक्षक श्याम सिंह यांनी सांगितले की, विमान शहरातील उचैन भागात एका मोकळ्या मैदानात कोसळले. भरतपूर डीएसपी म्हणाले की त्यांना सकाळी 10 वाजता विमान अपघाताची माहिती मिळाली आणि वैमानिकाचा शोध सुरू होता. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास विमान अपघात झाल्याची माहिती मिळाली. येथे आल्यानंतर ते भारतीय वायुसेनेचे लढाऊ विमान असल्याचे आढळून आले. 






इतर महत्वाच्या बातम्या