Hapur Boiler Explosion: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) हापुर येथे (Hapur) केमिकल फॅक्ट्रीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका बॉयलरमध्ये स्फोट झालाय. त्यामुळे 9 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय. या दुर्घटनेत अनेकजण जखमी झालेत. जवळलील सरकारी रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत. दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव पथक आणि पोलीस पोहचले अलून मदत कार्य सुरु आहे. स्थानिक अधिकाऱ्यांच्यामध्ये मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 
 
या दर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृतदेह मिळाले असून ते गंभीररित्या भाजले गेलेले आहेत. दुर्घटना झालेल्या फॅक्ट्रीमध्ये अद्याप अनेक कामगार अडकले असल्याची शक्यता आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोट इतका भीषण होता की, त्याचा आवाज दूर दूर पर्यंत ऐकू येत होता. येथील आयजी प्रवीण कुमार म्हणाले की, हापूर जिल्ह्यातील धौलाना भागात यूपीआयडी कारखाना आहे. या कारखान्यात केमिकल (Chemical factory) बनवले जाते. शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाला. येथे फॉरेन्सिक आणि अन्य पथकं पोहचली असून घटनेचा तपास करत आहेत. या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल. 


 पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केलेय.  हापूर जिल्ह्यात बॉयलरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत आठ मजुरांचा मृत्यू झाल्याबद्दल त्यांनी तीव्र शोक व्यक्त केलाय. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त केल्या. 






मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने घटनास्थळी पोहोचण्यास सांगितले. सोबतच या प्रकरणाची चौकशी करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अपघातात जखमी झालेल्यांना योग्य उपचार देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.