काँग्रेसनं प्रियांका गांधींना सक्रीय राजकारणात आणल्यापासून त्यावर देशात चर्चा रंगत आहेत. यात आता बिहारच्या या मंत्र्यांनी वादग्रस्त विधान करत वादाला निमंत्रण दिलं आहे.
सौंदर्यानं मतं मिळवता येतात, या चुकीच्या गृहितकावर काँग्रेस सध्या चालली आहे. पण निवडणूक ही सुंदरतेच्या बळावर जिंकता येत नाही, असा टोलाही विनोद झा यांनी काँग्रेसला लगावला आहे. प्रियांका या काहीही झालं तरी, घोटाळेबाज आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या रॉबर्ट वाड्राच्या पत्नी आहेत, असंही विनोद झा म्हणाले. भारताची लोकशाही परिपक्व होण्याच्या मार्गावर आहे, अशात काँग्रेसचा हा निर्णय लोकशाहीसाठी योग्य नाही, असेही झा यांनी म्हटले आहे.
झा यांच्या आधी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनीही प्रियांका यांच्या राजकीय आगमनावर टीका केली होती. प्रियांका गांधी एक अशा महिला आहेत ज्यांच्या पतीवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे मोदींनी म्हटले होते.
प्रियांका गांधी इंदिरा गांधींसारख्या दिसतात. मात्र कुणासारखे दिसण्याने त्यांच्यासारखे कर्तृत्व मिळवता येत नाही. असं असतं तर आपल्याकडे कितीतरी अमिताभ बच्चन आणि विराट कोहली असले असते असेही ते म्हणाले. इंदिरा गांधींसारख्या दिसण्यावरून त्यांनी हा टोमणा मारला होता.