7th Pay Commission Update : देशातील लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना या आठवड्यात केंद्र सरकारकडून मोठी बातमी मिळू शकते. गेल्या 18 महिन्यांपासून रखडलेल्या डीएच्या थकबाकीवर या आठवड्यात निर्णय घेतला जाऊ शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएच्या थकबाकीबाबत पुढील बैठकीत निर्णय घेतला जाऊ शकतो.
बैठकीत होणार निर्णय
यावेळी बैठकीत केंद्र सरकारने रखडलेल्या डीएबाबत निर्णय घेतल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होण्यासोबत त्यांच्या खात्यात एकाच वेळी दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा होऊ शकते.
वन टाईम सेटलमेंट
नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (GCM) चे सचिव शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, सरकार अडकलेल्या डीएच्या पैशांचा एकवेळ सेटलमेंट करू शकते.
सुमारे दोन लाख रुपये खात्यात जमा होतील
नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे शिव गोपाल मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, जर आपण लेव्हल वन कर्मचाऱ्यांबद्दल बोललो, तर डीएची थकबाकी 11,880 ते 37,554 रुपये आहे. तेच जर आपण लेव्हल 13 कर्मचाऱ्यांबद्दल बोललो तर त्यांचे मूळ वेतन 1,23,100 ते 2,15,900 रुपये आहे. या व्यतिरिक्त, जर आपण लेव्हल 14 साठी पाहिले तर कर्मचाऱ्याच्या हातात DA थकबाकी रुपये 1,44,200 ते 2,18,200 रुपये दिली जाईल.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांबद्दल बोलायचे झाले तर अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकानुसार (AICPI) या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2021 पर्यंत 33 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. सीपीआयचा म्हणजे ग्राहक किंमत निर्देशांक जर 125 पर्यंत राहिला तर महागाई भत्ता आणखी 3 टक्क्यांनी वाढू शकतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
- भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरण : आरोपींना 6 वर्षाची शिक्षा, मुख्य सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि केअरटेकर पलक दोषी
- Coronavirus Update : देशात कोरोनाची तिसरी लाट शिगेला? काय म्हणालं केंद्रीय आरोग्य मंत्रालय : वाचा सविस्तर
- Reservation in Promotion : पदोन्नती आरक्षणासाठी माहिती गोळा करणे गरजेच, त्याआधी निकाल शक्य नाही : सर्वोच्च न्यायालय
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha