महाराष्ट्र-छत्तीसगडच्या सीमेवर सात नक्षलवाद्यांना कंठस्नान
एबीपी माझा वेब टीम | 03 Aug 2019 12:08 PM (IST)
या दिवशी ही मोठी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन एक-47, 303 रायफल, 12 बोर बंदुका, सिंगल शॉट रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.
संग्रहित फोटो
छत्तीसगड : राजनांदगाव जिल्ह्यातील बागनदी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र सीमेवरील शेरपाल आणि सीटगोटाच्या डोंगरावर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. यामध्ये सात माओवाद्यांना कंठस्नान घातले गेले. चकमकीत मारल्या गेलेल्या नक्षल्यांमध्ये 4 पुरुष तर 3 महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या कारवाईनंतर मोठ्या प्रमाणात शत्रसाठा जप्त करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस, डीआरजी आणि सीआरपीएफची संयुक्त कारवाई करण्यात आली. राजनंदगावमध्ये बागनदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या सीतागोटा जंगलात ही चकमक झाली. छत्तीसगडचे पोलीस महासंचालक डी.एम.अवस्थी यांनी ही माहिती दिली. नक्षल्यांनी पुकारलेल्या संपूर्ण दंडकारण्य बंदचा आज शेवटचा दिवस होता. या दिवशी ही मोठी कारवाई करण्यात आली. घटनास्थळावरुन एक-47, 303 रायफल, 12 बोर बंदुका, सिंगल शॉट रायफल आणि मोठ्या प्रमाणात दारूगोळा हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान अजूनही कोम्बिंग ऑपरेशन सुरु असल्याची माहिती आहे.