नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या सर्व मंत्र्यांसह आम आदमी पक्षाच्या 60 आमदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पंतप्रधान निवासस्थानाबाहेर उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया सर्व आमदारांसह स्वतःला अटक करवून घेणार होते. मात्र त्याआधीच पोलिसांनी सर्व आमदार आणि मंत्र्यांना ताब्यात घेतलंय.


 
मनिष सिसोदिया काल दिल्लीतल्या गाजीपूर मंडी परिसरात गेले असताना त्यांनी व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप आहे. या घटनेची तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी आपच्या आमदारांची बैठक झाली.

 
या बैठकीत सिसोदिया पंतप्रधान कार्यालयाबाहेर पोलिसांना शरण जातील असं ठरलं. त्यानुसार पंतप्रधान निवासाकडे परवानगी न घेता निघालेल्या आमदार आणि मंत्र्यांच्या गाडीला पोलिसांनी रस्त्यात अडवून ताब्यात घेतलंय.