नवी दिल्ली : राजस्थानमधील जयपूर जिल्ह्यात रविवारी झिका व्हायरसच्या आणखी सहा केस समोर आल्या आहेत. त्यामुळे झिकाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 123 वर पोहोचल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली. उपचारानंतर 123 पैकी 105 रुग्ण बरे झाल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
राज्य आरोग्य विभागाने तपासणी, पडताळणी आणि पहिल्या तिमाहीतील झिका प्रभावित गर्भवती महिलांसाठी पाच सदस्यीय समिती नियुक्त केली आहे. वेळोवेळी या समितीकडून आरोग्य संचालकांना अहवाल सादर करण्यात येईल, असं एका आदेशात म्हटलं आहे.
जयपूरमधील शास्त्रीनगर भागातून झिकाचे जास्त प्रकरणं समोर आले आहेत. सरकारी पातळीवर झिका रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हा व्हायरस एडीज इजिप्टी मच्छरापांसून पसरतो, ज्यामुळे ताप, त्वचेवर सुरकुत्या, डोळ्यांना त्रास आणि शरीर, डोकेदुखीचा त्रास होतो. गर्भवती महिलांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. भारतात सर्वात अगोदर हा आजार जानेवारी 2017 मध्ये समोर आला होता. यानंतर त्याच वर्षी जुलैमध्ये तामिळनाडूत कृष्णागिरी जिल्ह्यात दुसरा रुग्ण आढळून आला होता.
गंभीर निगराणी आणि मच्छरांवर नियंत्रण मिळवल्यानंतर हा व्हायरस आटोक्यात आला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून यावर सातत्याने नजर ठेवली जात आहे. पण गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमध्ये झिका व्हायरस गंभीर समस्या बनत चालली आहे.
राजस्थानमध्ये आतापर्यंत 123 जणांना झिका व्हायरसची लागण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2018 10:41 AM (IST)
झिकाची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 123 वर पोहोचल्याची माहिती सरकारी अधिकाऱ्याने दिली. उपचारानंतर 123 पैकी 105 रुग्ण बरे झाल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -