मुंबई : तुमच्या हॉटेलच्या आजपासून (बुधवार) बिलात बऱ्यापैकी कपात होणार आहे. कारण आज सकाळपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. ते मुंबई बोलत होते.
कोणत्याही हॉटेलचालकाने 5 टक्क्यांपेक्षा अधिक जीएसटी आकारल्यास त्याच्याविरोधात कारवाई करण्याचा इशाराही बापटांनी दिला आहे.
याआधी वेगवेगळ्या क्लासच्या हॉटेल्सना वेगवेगळा जीएसटी लावण्यात आला होता. 9 टक्क्यांपासून 28 टक्क्यांपर्यंत जीएसटी लागल्याने चहूबाजूने टीका सुरु झाली होती. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकारच्या हॉटेलना सरसकट 5 टक्के जीएसटी लागणार असल्याचं घोषित केलं. त्याची अंमलबजावणी तातडीने होणार आहे.
अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची माहिती :
‘हॉटेलात 18 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर जीएसटीची अंमलबजावणी आजपासून सुरु होणार आहे. हॉटेल मालक किंवा विक्रेते व्हॅट कमी न करता वर जीएसटी लावत होते. यामुळे ग्राहकांची फसवणूक सुरु होती. मात्र, आजपासून हॉटेलमधील दर पत्रकात बदल करणं आवश्यक असेल. जे हॉटेल मालक दर कमी करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यासाठी सरकार हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे.’ अशी माहिती गिरीश बापट यांनी दिली.
या निर्णयामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरुवातीला हॉटेलिंगवर तब्बल 18 टक्के जीएसटी आकारण्यात आला होता. याबाबत बरीच नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे आता सरकारनं 18 टक्क्यांवरुन जीएसटी थेट 5 टक्क्यांवर आणला आहे.
‘MRPवर जीएसटी लागू शकत नाही’
‘टॅक्स कमी झाला म्हणून दरपत्रक वाढवून अधिकचे दर लागू केले जाऊ नये. तसेच MRPवर जीएसटी लागू शकत नाही. याकडे ग्राहकांनी लक्ष द्यावे.’ असंही गिरीश बापट यावेळी म्हणाले.
‘विनापरवानगी काही बदल केल्यास कारवाई करण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. जुन्या मालावर नव्या दरानुसार स्टिकर लावण्यात यावेत. हॉटेल, मेडिकल दुकाने व इतर दुकाने याठिकाणी सरकारनं सुरु जीएसटीसाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनचा नंबर दर्शनी भागात लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. तसेच जीएसटी नंबर ही समोर लावले जावेत. MRPचे लेबल लावून कमी झालेले दर नोंदवणे सक्तीचे आहे.’ अशीही माहिती यावेळी गिरीश बापट यांनी दिली.
संंबंधित बातम्या :
खवय्यांना दिलासा, हॉटेलमधील जेवणावरचा जीएसटी 18 वरुन 5 टक्क्यांवर
177 वस्तूंवरील जीएसटी 28 टक्क्यांवरुन 18 टक्क्यांवर!
गुवाहाटीत GST काऊन्सिलची बैठक, मोठ्या बदलांची शक्यता
आजपासून हॉटेलिंग स्वस्त, बिलावर 5 टक्केच जीएसटी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Nov 2017 06:00 PM (IST)
आजपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -