तिरुवअनंतपुरम (केरळ): पाच कंपन्यांच्या सीईओंनी समुद्राच्या पाण्यात चक्क परिषद भरवली. केरळमधल्या कोवलममधील ग्रोव्ह बीचपासून समुद्रात 50 मीटर आत आणि 6 मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही बैठक पार पडली.
जलप्रदुषणाविषयी जनजागृती आणि जलसंवर्धनासंदर्भात या परिषदेत तब्बल 35 मिनिटे चर्चा झाली. या अनोख्या अभियानाला ओशन लव्ह असं नाव देण्यात आलं. समुद्र संवर्धनासाठी जमेल ते सर्व प्रयत्न करण्यावर या बैठकीत एकमत झालं. यासाठी लवकरच एक क्लबदेखील बनवण्यात येणार आहे.
उद्या समुद्र ग्रुप ऑफ हॉटेलचे सीईओ राजा गोपाल अय्यर, टीसीएसचे दिनेश खाम्पी, यूएसटी ग्लोबलच्या हेमा मेनन, नियोलॉजिक्सचे श्याम कुमार आणि ए-वन मोबिलिटी सोल्युशनचे प्रमुख रॉनी थॉमस अशा पाच सीईओंमध्ये ही बैठक पार पडली. स्कूबा डायव्हिंग गिअर्स घालून यू आकाराच्या टेबलवर ही चर्चा रंगली.