सिमला : महाडच्या सावित्री नदीवरील पूल दुर्घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातही पुरामुळे एक पूल वाहून गेला आहे. कांगडा जिल्ह्यात ही घटना घडली आहे. काही क्षणातच या पुलाचं होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेची भयानक दृश्ये कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.


 

हा पूल 1972 मध्ये बांधण्यात आला होता. 44 वर्ष जुन्या या पुलाचे सगळे दहा खांब पाण्यात वाहून गेले. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. पुलाची स्थिती योग्य नसल्याचा संशय आल्याने प्रशासनाने हा पूल बंद केला होता.

 

हिमाचल प्रदेशाला पंजाबशी जोडण्याचं काम हा पूल करत होता. मात्र आता हा पूलचा कोसळल्याने या भागाचा पंजाबमधील पठाणकोटशी संपर्क तुटला आहे. पठाणकोटला जाण्यासाठी या भागातील नागरिकांना आता तब्बल 70 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागत आहे. एरव्ही या पुलावर बरंच ट्रॅफिक असतं.

 

महाडमध्ये 10 दिवसांपूर्वी पूल कोसळल्याने दोन एसटी बस आणि काही लहान वाहनं वाहून गेली होती. या दुर्घटनेत 42 जण बुडाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली होती. त्यापैकी 27 जणांचे मृतदेह हाती लागले असून एसटीचाही शोध लागला आहे.

 

पाहा व्हिडीओ