नवी दिल्ली : लोकसभेनंतर (Loksabha) राज्यसभेच्या (Rajyasabha) खासदारांवरही निलंबनाची (Suspension) कारवाई करण्यात आलीये. राज्यसभेतील खासदार हे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहेत. राज्यसभेतील एकूण 34 विरोधी पक्षातील खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. अनेक सदस्य हे सभागृहाचा अपमान करतात असं म्हणत राज्यसभेचं सभापती जगदीप धनखड यांनी निलंबनाची कारवाई केलीये. गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज होत नाही, त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


काँग्रेसचे नेते जयराम रमेश, के.सी वेणुगापोळ, रणदीप सुरजेवाला या खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. काही वेळापूर्वीच सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी लोकसभेतील 30 सदस्यांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर आता तीन सदस्यांना विशेषाधिकार समितीचा अहवाल येईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. 


 






निलंबित करण्याचं कारण काय?


राज्यसभेचे सभापती जगदीप धनखर म्हणाले की, अनेक सदस्य खंडपीठाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज होत नाही. त्यामुळे चालू अधिवेशनासाठी अनेक खासदारांना सभागृहातून निलंबित करण्यात येत आहे. कामकाज तहकूब करताना ते म्हणाले की, लोकांच्या भावना आणि त्यांच्या अपेक्षांचा आपण आदर करत नाही. 


लोकसभेतून खासदारांचं निलंबन


संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या 31 खासदारांना निलंबित करण्यात आलंआहे. त्यामध्ये लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chowdhury) आणि इतर प्रमुख खासदारांचा समावेश आहे. आजही  विरोधी पक्ष संसदेच्या सुरक्षेबाबतच्या आपल्या मागण्यांवर ठाम राहिले. यावरून लोकसभा आणि राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर या सर्व 31 खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या काळापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. या आधी दोनच दिवसांपूर्वी विरोधी पक्षांच्या 13 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं. लोकसभेच्या सुरक्षेच्या उल्लंघनाबाबत दोन्ही सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन देण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत आहेत. 


याआधी 13 खासदार निलंबित


याआधीही लोकसभेतील 13 विरोधी खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यात काँग्रेसचे टीएन प्रतापन, हिबी इडन, जोतिमणी, रम्या हरिदास, डीन कुरियाकोसे, व्हीके श्रीकंदन, बेनी बेहानन, मोहम्मद जावेद आणि मनीकोम टागोर यांचा समावेश आहे. द्रमुकच्या कनिमोळी, सीपीआय(एम)चे एस वेक्शन आणि सीपीआयचे के. हे सुब्बारायन आहे.


हेही वाचा : 


Parliament MP Suspended : लोकसभेतील 31 खासदार निलंबित, संसदेतील गदारोळानंतर संसदेतील खासदारांचे निलंबन सुरूच