अहमदाबाद : रेल्वेमध्ये महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारण जयपूर ते वांद्रे एक्स्प्रेसमध्ये स्लीपर बर्थ देतो, असं म्हणून एका इसमाने 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.


जयपूर-वांद्रे ट्रेनमध्ये एका इसमाने स्लीपर बर्थ देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर पँट्री कारमध्ये नेऊन बलात्कार केला, असा आरोप पीडित महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

धावत्या ट्रेनमध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने प्रवाशांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण ट्रेनमध्ये महिला सुरक्षित आहेत का, या प्रश्नाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे.