मुंबई : महागड्या एअरलाइन्सना कडी टक्कर देत असतानाच रेल्वेने रस्ते वाहतुकीलाही टक्कर देण्याचा निर्णय घेतला आहे. यातच शताब्दी एक्स्प्रेसच्या प्रवासी भाड्यात तब्बल 30 टक्के घट करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे.


सध्या रेल्वेने शताब्दी एक्स्प्रेसनं कमी अंतरावर धावणाऱ्या मार्गांचा अभ्यास केला आहे. या मार्गांवरील शताब्दी एक्स्प्रेसचं भाडं कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. शताब्दी एक्स्प्रेसच्या भाड्यात 30 टक्क्यांची घट करण्यात येणार असल्यानं रेल्वेचं भाडं वॉल्वो बस किंवा अन्य एसी बसच्या तुलनेतही कमी होण्याची शक्यता आहे.

रेल्वेनं प्रायोगिक तत्वावर दोन शताब्दी एक्स्प्रेसमध्ये तिकीट दरांमध्ये 30 टक्के कपात केली होती. यात रेल्वेला मोठा फायदा झाला. त्यामुळे आता पुढील महिन्यापासूनच रेल्वे या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.