नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी खूषखबर आहे. येत्या 1 जुलैपासून केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा फायदा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या जवळपास 50 लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.


केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना घरभाडे भत्त्यांसोबत इतरही अनेक सुधारित भत्ते देण्यात येतील. जुलै महिन्यापासून याची अंमलबजावणी करण्यात येईल. आतापर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार कर्मचाऱ्यांना भत्ते न दिल्याने केंद्र सरकारला महिन्याकाठी 2 हजार 200 कोटींचा फायदा झाला आहे.

1 जानेवारीपासूनची आकडेवारी विचारात घेता, सुधारित भत्ते न दिल्यानं सरकारच्या 40 हजार कोटींची बचत झाली आहे.