जम्मू-काश्मीर: जम्मू कश्मीरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी सैनिकांनी भ्याड हल्ला केला आहे. ज्यामध्ये तीन भारतीय जवानांना वीर मरण आलं आहे. जम्मूमधील माछिलमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्लात 3 भारतीय जवान शहीद झाले आहेत. ऐवढंच नाही तर पाक सैन्यानं या जवानांच्या मृतदेहाची विटंबनाही केली.
पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याला चोख उत्तर देऊ असं भारतीय लष्कराच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, 20 ऑक्टोबरला देखील पाकिस्तानीनं लष्करानं एका भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.
सुरक्षा तज्ज्ञ पीके सहगल म्हणाले की, 'पाकिस्तान सर्जिकल स्ट्राइकचं दु:ख अजून विसरलेला नाही. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन केलं आहे. पाकिस्तान जे करत आहे ते मानवाधिकाराचं उल्लंघन आहे.'
जगभरातील लष्कर हे कोणत्याही सैनिकांच्या मृतदेहाला सन्मानपूर्वक वागणूक देतं. पण पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली आहे.
दरम्यान, पाकिस्तानकडून आज सकाळी तब्बल 2 तास गोळीबार सुरु होता. घुसखोरीसाठी पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार सुरु होता. दरम्यान, काश्मीरच्या बांदिपुरा भागात आज सकाळी भारतीय जवानांनी २ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.