नवी दिल्ली : केरळमध्ये होणारं नैऋत्य मान्सूनचं आगमन दोन दिवसांनी लांबलं असून यंदाचा मान्सून दोन दिवस उशिरा म्हणजे 3 जून रोजी केरळमध्ये दाखल होत आहे. आता मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वानुमानासंबंधी महत्वाची माहिती आज दुपारी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात येणार आहे. या संबंधी आज दुपारी 12 ते 12.30 या वेळेच्या दरम्यान भारतीय हवामान खात्याची एक महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे. ही परिषद व्हर्च्युअल पद्धतीनं आयोजित करण्यात आली आहे. 


 






या आधी भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस मान्सूनपूर्व पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळात मान्सून उशीरा दाखल होणार असल्याचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवणार आहे. कोकणातही आता दोन दिवस उशिरा मान्सूनचं आगमन होणार आहे. कोकणात मान्सून 10 जूनला तर मुंबईत 12 जूनपर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


सध्या केरळमध्ये आंबेसरी कोसळत आहेत. त्यामुळे किनारपट्टीच्या दक्षिणेकडील भागावर पावसाळा सुरु होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता विभागाने व्यक्त केली होती. जवळपास निम्म्या शेतजमिनीत सिंचन नाही आणि तांदूळ, कॉर्न, ऊस, कापूस आणि सोयाबीनची पिके घेण्यासाठी जून ते सप्टेंबरच्या वार्षिक पावसावर अवलंबून असतो. या पिकांसाठी पावसाचे वेळेवर आगमन महत्त्वाचे ठरते.


महत्वाच्या बातम्या :