28 वर्षीय CISF जवानाची बंगळुरु विमानतळावर आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 16 Jan 2017 12:30 PM (IST)
बंगळुरु : 28 वर्षीय सीआयएसएफ जवानाने बंगळुरुच्या विमानतळावर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरेश गायकवाड असं आत्महत्या करणाऱ्या जवानाचं नाव आहे. सोमवारी सकाळी बंगळुरुतील केम्पा गौडा विमानतळावर सुरेशने हे टोकाचं पाऊल उचललं. सर्व्हिस रायफलमधून गोळी झाडून त्याने आयुष्य संपवलं. त्याच्याकडे कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी घरगुती वादातून त्याने हे पाऊल उचलल्याची शक्यता वर्तवली जात आहे. बंगळुरु पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. काहीच दिवसांपूर्वी सुट्टी नाकारल्यामुळे एका सीआयएसएफ जवानाने आपल्या वरिष्ठांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना बिहारमध्ये समोर आली होती.