मुंबई : औरंगाबादमधील 2006 च्या शस्त्रसाठा प्रकरणी दोषी अबू जुंदालसह सात जणांना मरेपर्यंक जन्मठेप ठोठावण्यात आली आहे. तर दोघांना 14 वर्षांची जन्मठेप आणि तिघांना आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. विशेष मोक्का न्यायालयाने हा निर्णय दिला.


 

ज्या तिघांना 8 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे, त्यांनी आधीच 10 वर्ष शिक्षा भोगल्याने त्यांची आता सुटका करण्यात येईल.

 

दरम्यान, प्रकरणात न्यायालयाने 22 दोषींपैकी 11 जणांना दोषी ठरवलं. त्यामध्ये 26/11 मुंबई हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदालचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजेत या सर्व दोषींवरील मोक्का हटवण्या आला आहे.


शस्त्रसाठा प्रकरणी अबु जुंदालसह 11 जण दोषी, मात्र मोक्का हटवला


 

काय आहे हे प्रकरण?

महाराष्ट्र एटीएसने 8 मे 2006 रोजी टाटा सुमो आणि इंडिका कारचा पाठलाग करुन औरंगाबादमधील वेरुळ इथे तीन संशयित अतिरेक्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून  30 किलो आरडीएक्स, 10 एके-47 रायफल आणि 3200 गोळ्या जप्त केल्या होत्या. मात्र इंडिका कार चालवत असलेला अबू जुंदाल पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला.

 

या प्रकरणी एटीएसने अबू जुंदालसह 22 जणांना अटक केली होती. विशेष मोक्का न्यायालयाने ऑगस्ट 2016 मध्ये 22 जणांविरुद्ध आरोप ठेवले होते. सुनावणी दरम्यान सरकारच्या वतीने 100 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी 16 जणांच्या साक्षी नोंदवल्या.

 

या प्रकरणाचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने आज 22 पैकी 11 जणांना दोषी ठरवलं.

 

या सात जणांना मरेपर्यंत जन्मठेप

*सय्यद जैबुद्दीन अन्सारी उर्फ अबु जुंदाल

*बिलाल अहमद अब्दुल रज़ाक

* सय्यद आकिफ सय्यद जफरुद्दीन

* अफरोज खान शाहिद खान पठाण

* फैजल अताउर रेहमान शेख

* मोहम्मद असलम

* मोहम्मद अमीर शकील अहमद शेख

 

या दोघांना 14 वर्षांची जन्मठेप

*डॉ मोहम्मद शरीफ शब्बीर अहमद

* मोहम्मद मुज़फ्फर मोहम्मद तनवीर

 

8 वर्षांची शिक्षा ठोठावलेले 3 दोषी (यांची शिक्षा पूर्ण झाली आहे)

*मुस्ताक अहमद मोहम्मद इशाक शेख

*जावेद अहमद अब्दुल मजीद अन्सारी

* अफजल खान नबी खान