मुंबई : राहुल गांधी काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनण्यासाठी काही तास उरले आहेत. पक्षाध्यक्ष म्हणून मावळत्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची कारकीर्दही तेवढीच महत्त्वाची ठरली. ज्येष्ठांची गर्दी आणि मरगळ आलेल्या काँग्रेसची धुरा जेव्हा हातात घेतली तेव्हा त्यांनी पक्षांतर्गत संघर्षाला तोंड देत काँग्रेसला घराघरात पोहोचवलं. ज्या अवस्थेत सोनियांनी काँग्रेसची धुरा सांभाळली होती, तशाच अवस्थेत आज राहुल गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्र जात आहेत.

सोनिया पर्वाचा अस्त

  1. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या कुटुंबातील दोन सदस्यांच्या हत्या जवळून पाहिल्या

  2. सोनियांनी राजीव गांधींच्या हत्येनंतर स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलं

  3. पक्षाध्यक्ष होण्यापूर्वी आणि नंतरही नरसिंहराव आणि सीताराम केसरी यांसारख्या ज्येष्ठांशी संघर्ष

  4. सोनिया गांधी ज्येष्ठांची गर्दी आणि मरगळ आलेल्या काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या

  5. परदेशी मुळाच्या मुद्द्यावर शरद पवारांनी पक्ष फोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, सोनियांना पहिला मोठा धक्का बसला

  6. 'लिडर नव्हे रिडर', 'इटालियन मेमसाब', अशी टीका सहन करावी लागली

  7. सोनियांचं शिक्षण, त्यांचा व्यवसाय यावरुनही त्यांची खिल्ली उडवली गेली

  8. हिंदूतून थेट बोलता न येणं आणि वाचून बोलणं यावरुनही टिंगल

  9. सोनियांचं राष्ट्रीयत्व आणि त्या ख्रिश्चन असणं यावरुन गदारोळ

  10. बोफोर्स-क्वात्रोकी प्रकरणात राजीव गांधींनंतरही सोनियांना आजही आरोपांना तोंड द्यावं लागतं

  11. 2004 साली वाजपेयी-अडवाणी असतानाही सोनियांनी देश की बहू बनून भाजपचा पराभव केला

  12. 'अंतरात्मा की आवाज' ऐकून सोनियांना केलेल्या पंतप्रधानपदाचा त्याग प्रचंड गाजला

  13. काँग्रेससह समविचारी पक्षांची 'यूपीए' बनवण्यात सोनियांचा मोठा वाटा

  14. मात्र राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाद्वारे सोनिया या समांतर पंतप्रधान बनल्याची टीका झाली

  15. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्यापेक्षा मंत्री सोनियांचे आदेश पाळत, असं म्हटलं जायचं

  16. काँग्रेसवरच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांसाठी मनमोहन सिंह आणि श्रेयासाठी सोनिया असं चित्र बनलं

  17. विविध भ्रष्टाचार प्रकरणं, निर्भया, अण्णा आंदोलन यावर सोनियांच्या मौनाने पक्षाला अडचणीत आणलं

  18. गुजरात निवडणुकीत मोदींना सोनियांनी 'मौत का सौदागर' म्हणणं काँग्रेसला महागात पडलं

  19. आपल्यानंतर अध्यक्षपदी राहुल की प्रियांका यावर पक्षांतर्गत संघर्षालाही तोंड दिलं

  20. सोनियांनी 1997 साली ज्या अवस्थेत अध्यक्षपद स्वीकारलं त्याच अवस्थेत राहुल गांधींकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा